औरंगाबाद : जिल्ह्यात ३४ रुग्णांचे अहवाल रविवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. यात मनपा हद्दीतील ३१ तर ग्रामीण भागांतील ३ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ९४२ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ८१५९ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ४३७ जणांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला ४३४६ जणांवर उपचार सुरु आहेत.
मनपा हद्दीतील रुग्ण नक्षत्रवाडी २, भावसिंगपुरा १, छत्रपती नगर, बीड बायपास १, राजीव गांधी नगर १, छावणी परिसर ३, पन्नालालनगर ३, पद्मपुरा १, खोकडपुरा १, टाऊन सेंटर २, पंचशील नगर ५, आयोध्यानगर २, ठाकरे नगर, एन दोन येथे १, चेलिपुरा १, एन दोन सिडको १, धूत हॉस्पीटल परिसर १, हर्सुल ३, बन्सीलालनगर २
ग्रामीण भागातील रुग्ण वैजापूर १, वडगाव कोल्हाटी, बजाजनगर १ लक्ष्मी कॉलनी, गंगापूर १