औरंगाबाद : शहरात दोन नवीन रुग्ण कोव्हीड-१९ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरातील यादव नगर येथील २९ वर्षीय व्यक्ती व सातारा परिसरातील ४० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने रुग्ण संख्या २० वर गेली आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी यांनी दिली.
सलग तीन दिवस कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नव्हता यामुळे शहरवासीयांना दिलासा होता. मात्र शुक्रवारी रात्री दोन संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात सलग चोथ्या दिवशी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, सायंकाळी 42 संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आले असुन त्या रुग्णांना सुटी देण्यात आली. शहरात कोरोनाचे आतापर्यंत २० रुग्ण आढळुन आले आहेत. यातील एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मागील चार दिवसांपासून शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे. शुक्रवार दिवसभरात तब्बल ४२ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासादायक चित्र होते.