औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बुधवारी दुपारी ३५६ झाली. सकाळी २८ आणि दुपारी ७ असे ३५ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले.
कबाडीपुरा येथे ५, दत्तनगर -कैलासनगर येथे ४, बजाजनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनी येथे एक, हक टॉवर, रेल्वेशेस्टेशन रोड येथे एक आणि कबीरनगर-उस्मानपुरा, सातारा रोड येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. यासह पूर्वी रुग्ण आढळून आलेल्या जयभीमनगर येथे ७, बायजीपुरा येथे ४ , संजयनगर-मुकुंदवाडी येथे ७, पुंडलीकनगर येथे ३ , बेगमपुरा येथे एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबधितांची संख्या ३५६ झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. कुलकर्णी यांनी सांगितले.
५१ भागांत आढळले रुग्णआतापर्यंत शहरातील ४६ भागांत कोरोनाचे रुग्ण आढळून आले. आता ५ नव्या भागांमुळे ही संख्या ५१ झाली आहे. यात ४० भागांतील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ११ भागांत काही रुग्ण कोरोनामुक्त तर काहींचा मृत्यू झालेला आहे.