औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शंभरावर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान होणे सुरूच आहे. सोमवारी सकाळी १०२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३६३२ झाली आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांत बारी कॉलनी १ वाळूज ३, गजानननगर ३, गजगाव, गंगापूर १, न्यायनगर, गारखेडा परिसर १, मयूरनगर ३, सुरेवाडी १, शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी २, भाग्यनगर ५, एन अकरा, सिडको २, सारा वैभव, जटवाडा रोड २, जाधववाडी २, मिटमिटा ३ गारखेडा परिसर ३, एन सहा, संभाजी पार्क १, उस्मानपुरा १, बजाजनगर, वाळूज २, आंबेडकरनगर, एन सात १, भारतनगर, एन बारा, हडको १, उल्कानगरी, गारखेडा १, नॅशनल कॉलनी १, नागेश्वरवाडी २, संभाजी कॉलनी १ आनंदनगर १, आयोध्यानगर, सिडको १, शिवाजी कॉलनी, मुकुंवाडी ३, संत ज्ञानेश्वरनगर १, राजे संभाजी कॉलनी ४, मुकुंदवाडी १, न्यू पहाडसिंगपुरा, जगदीशनगर १, काल्डा कॉर्नर १, एन सहा, मथुरानगर १, नवजीवन कॉलनी, हडको, एन अकरा ४, एन अकरा २, टीव्ही सेंटर ४, सुदर्शननगर १, दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर ५ , जयभवानी चौक, बजाजनगर २, महादेव मंदिर परिसर, बजाजनगर १, शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, सारा वृंदावन हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर ३, स्वेदशिप हाऊसिंग सोसायटी, बजाजनगर १, जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर ३, फुले नगरी, पंढरपूर ३, पंचमुखी महादेव मंदिराजवळ १, करमाड ३, मांडकी २, पळशी ४, शिवाजीनगर, गंगापूर ४, भवानीनगर, गंगापूर १ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ४९ महिला व ५३ पुरुष आहेत.