शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : युद्धात तोफेच्या तोंडी असलो तरी ‘चिंता नको आमची’ शूर योद्धे आम्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 19:13 IST

 कोरोनामुक्तीसाठी लढणाऱ्या डॉक्टरांशी संवाद 

ठळक मुद्दे‘मिशन कोरोना झीरो औरंगाबाद’ पालकांची समजूत काढून कर्तव्यावर सतत तत्पर

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : आई-बाबा मुळीच घाबरू नका, वैद्यकीय शिक्षण घेऊन रुग्णसेवा करणे हाच खरा उद्देश आहे. युद्धात तोफेच्या तोंडी असलो तरी ‘चिंता नको आमची’ कोरोना झीरो मिशन औरंगाबादच्या फौजेतील शूर योद्धे आहोत आम्ही, असा संवाद साधत पालकांची समजूत काढून कर्तव्यावर सतत तत्पर टीम दिसत आहे.

कोरोनाचा संसर्ग अत्यंत घातक आहे, तुम्ही जाऊ नका असा माता-पित्यांचा व नातेवाईकांचा सततचा सल्ला; परंतु त्यांना एकच प्रश्न केला की, युद्धात सैनिकांनी घरी बसून नुसत्या भाकरी खायच्या काय. आरोग्य सेवेला प्राधान्य असून, त्यासाठी आम्ही सदैव तयारीत आहोत.  सर्व साधनांचा पुरवठा मनपा आरोग्य विभागाने केला असल्याने मग कशाची भीती, असा प्रतिसवाल त्यांनी केला. पूर्वीच्या तुलनेत अँटिजन टेस्टमुळे तात्काळ निदान होत असून, दक्षतादेखील अधिक प्रमाणात घेतली जात आहे.  

मास्क, फेस मास्क, हँडग्लोज, अत्यंत दर्जेदार पीपीई कीटमुळे सुरक्षितपणे वैद्यकीय सेवा देत असून, औरंगाबादेत इतरही वैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश आहे. कोरोना तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना असलेली भीती आता कमी झाली असून, नाक व घशातून घेतला जाणारा स्वॅब टेक्निशियनकडे दिला जातो. काही समज-गैरसमजामुळे अनेक जण घाबरतात; परंतु आता नागरिक स्वत:हून स्वॅब देण्यासाठी येत आहेत.  दंत वैद्यकियांच्या टीममधील डॉ. मधुरा चिखले या नागपूर, डॉ. रोशनी डहाके या यवतमाळ, डॉ. मोनिका सुरवसे, डॉ. शीतल झाडे, डॉ. कोमल दीपके या औरंगाबादेतील योद्ध्या असून, इतरही योद्ध्यांसह त्या मोठ्या हिमतीने स्वॅब घेत आहेत. 

आई-बाबा चिंता नको...औरंगाबादेतील अँटिजन टेस्टसाठी तयार केलेली फौजही अत्यंत मेहनती असून, आई-बाबा तुम्ही घाबरू नका,  प्रशासनदेखील काळजीपूर्वक लक्ष देत आहे. हे युद्ध आम्ही जिंकणार, मागे नाही हटणार, अशी हिंमत दररोज देत आहोत.- डॉ. मधुरा चिखले 

खबरदारीपूर्वक स्वॅब घेत आहोतयवतमाळहून रुग्णसेवेसाठी औरंगाबादला आले असून, आई-बाबा शिक्षक आहेत. त्यांना खूप चिंता होती;  परंतु रुग्णसेवेत आता कसलीही भीती वाटत नाही. तोफेच्या तोंडी असलो तरी खबरदारीपूर्वक स्वॅब घेत आहोत. स्वत:ची इम्युनिटी वाढविण्यासाठी प्रयत्न आहे. - डॉ. रोशनी डहाके 

घर स्वतंत्र अलगीकरणकर्तव्यावरून घरी गेल्यानंतर स्वतंत्र खोलीत स्वत:ला अलगीकरण करून घेत आहोत. कुटुंबाचा संवाद फोनवर किंवा दुरूनच होत आहे. आपल्यामुळे कुणालाही संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी बाळगत आहोत. काम जिकरीचे असले तरी ते टाळणे शक्य नाही. ज्या उद्देशाने वैद्यकीय सेवा पत्करली आहे. हिमतीने संघर्ष करण्याचा हाच तो क्षण आहे. घरच्यांनाही माझ्या कामावर गर्व वाटतो आहे. - डॉ. मोनिका सुरवसे 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर