औरंगाबाद : शनिवारी सकाळी ३० रुग्णांची वाढ झाल्यानंतर दुपारी आणखी २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे शहरात एकूण बाधितांची सख्या ९०० झाली आहे.
दुपारी वाढ झालेल्या २८ रुग्णांत कैलास नगर १, चाऊस कॉलनी १, मकसूद कॉलनी २, हुसेन कॉलनी ४, जाधववाडी १, न्यू बायजीपुरा गल्ली नं.३ येथील १, एन सहा संभाजी कॉलनी सिडको १, कटकट गेट १, बायजीपुरा १०, अमर को ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ सिडको येथील २, लेबर कॉलनी १, जटवाडा १, राहुल नगर १, जलाल कॉलनी १ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १६ पुरुष आणि १२ महिला रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.