औरंगाबाद : शहरात कोरोना सातशेपार गेला असून, गुुरुवारी सकाळी आणखी ५५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती टास्क फोर्सच्या अध्यक्ष डॉ. कानन येळीकर यांनी दिली. त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या आता ७४२ झाली आहे.
यात भीमनगर भावसिंगपुरा 15, शिवपुरी पडेगाव 1, उस्मानपुरा 7, सिल्कमिल कॉलनी1, कांचनवाडी1 , नारळीबाग 1, आरटीओ ऑफिस परिसर 2, गरमपाणी 1, बन्सीलाल नगर1, सातारा परिसर 2, सातारा ग्रामपंचायत परिसर 5, सातारा खंडोबा मंदिर परिसर 1, हुसेन कॉलनी गारखेडा 2, संजयनगर 3, न्यायनगर 2, दत्तनगर गल्ली नंबर पाच 1, पुंडलिकनगर 1, गुरू नगर न्यू नंदनवन कॉलनी, गारखेडा 1, शहानुरवाडी 1, किलेअर्क 1, बेगमपुरा 1, रहेमानिया कॉलनी 1,(आन्वा मारुतीमंदिर भोकरदन)घाटीत उपचार 1, सिल्लेखाना 1, नाशन दर्गा परिसर शहाबाजार 1 या भागांतील बाधीत रुग्णाचा समावेश आहे.