औरंगाबाद : जिल्ह्यातील ९६ रुग्णांचे गुरुवारी सकाळी पाॅझीटीव्ह आले. यात ग्रामीण भागातील ७३ तर मनपा हद्दीतील २३ जणांचा समावेश आहे.
एकूण बाधितांचा आकडा १३,६६२ झाला आहे. त्यापैकी ९६८० जण कोरोनामुक्त झाले.आतापर्यंत ४६४ जणांचा मृत्यू झाल्याने ३५८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ग्रामीण भागातील अँटीजनचाचणीद्वारे आढळलेल्या ६५ रुग्णांचा यामध्ये समावेश आहे.
मनपा हद्दीतील २३ रुग्ण --नागेश्वरवाडी १, एमजीएम मेडिकल कॉलेज परिसर ३, एन दोन सिडको २, मराठवाडा केमिकल इंडस्ट्री परिसर १, मार्ड हॉस्टेल १, खोकडपुरा १, मिटमिटा १, प्रबुद्ध नगर, पानचक्की परिसर ३, एन सात सिडको ५, शांतीनाथ सो., गादिया विहार १, साजापूर १, रोजा बाग १, आनंद नगर, कोटला कॉलनी १, फरहाद नगर, जटवाडा रोड १
ग्रामीण भागातील ७३ रुग्ण
औरंगाबाद ६, फुलंब्री ३, गंगापूर २२, खुलताबाद ८, सिल्लोड ३, वैजापूर ७, पैठण ४, सोयगाव १२, अंभई सिल्लोड १, स्नेहवाटिका, सिडको महानगर १, वाळूज १, बजाज नगर, वाळूज १, फुले नगर, वडगाव १, आडगाव माडरवाडी, कन्नड २, टाकळी, खुलताबाद १ या भागातील रुग्ण आढळून आले.