शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

coronavirus : ‘पॉझिटिव्हिटी’च्या बळावर कोरोनाबाधितांची मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 7:31 PM

महापालिकेच्या यंत्रणेचे श्रम आणि रुग्ण पॉझिटिव्हिटीच्या बळावर बरे होऊन घरी जात आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांसोबत ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी काही तास व्यतीत केले, त्याचा हा वृत्तांत.

ठळक मुद्देपॉझिटिव्ह रुग्णांसोबत काही तास महापालिकेची दर्जेदार सेवा

औरंगाबाद : कोरोना पॉझिटिव्ह म्हणताच चांगल्या चांगल्यांना घाम फुटत आहे. ज्यांना कोरोना झाला म्हटले त्यांच्या पायाखालची वाळू क्षणभर सरकते. कुटुंबियांच्या डोळ्यातून निव्वळ अश्रू वाहत असतात. चिमुकल्यापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील स्त्री-पुरुष महापालिकेच्या चिकलठाणा येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. महापालिकेच्या यंत्रणेचे श्रम आणि रुग्ण पॉझिटिव्हिटीच्या बळावर बरे होऊन घरी जात आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांसोबत ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी काही तास व्यतीत केले, त्याचा हा वृत्तांत.

शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागताच पालकमंत्री सुभाष देसाई यांनी चिकलठाणा एमआयडीसी येथे महापालिकेसाठी २५० खाटांचे स्वतंत्र कोविड हॉस्पिटल अवघ्या एक महिन्यात उभारून दिले. तीन कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या या रुग्णालयात सध्या २८९ स्त्री-पुरुष रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत या रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६७ आहे. शुक्रवारी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा पॉझिटिव्ह रुग्णांसोबत संवाद घडवून आणला. सर्वांना पीपीई कीट घालून पॉझिटिव्ह रुग्णांच्या वॉर्डात नेण्यात आले. प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाला कोविड रुग्णालयात दहा दिवस उपचार घ्यावे लागतात. ज्यांना जास्त दिवस रुग्णालयात झाले आहेत ते नवीन रुग्णांना मार्गदर्शन करतात. त्यांचे मनोबल उंचावण्याचा प्रयत्न करतात. यावेळी रुग्णांनी महापालिकेच्या सर्वोत्कृष्ट सेवेबद्दल ऋण व्यक्त केले. डॉक्टर आणि कर्मचारी खूप काळजी घेतात आणि जेवणाची गुणवत्ता चांगली असल्याची पावती रुग्णांनी दिली. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसताना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांची संख्या जवळपास ९० टक्के आहे. 

१२ तास पीपीई कीट घालणे अशक्यमहापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये बारा तास पीपीई कीट घालून काम करणे अशक्य आहे. एक तास कीट घातल्यानंतर प्रत्येकाला श्वास घ्यायला त्रास आणि प्रचंड घाम येतो. अशा परिस्थितीत कर्मचारी आणि डॉक्टर रुग्णांना सेवा देत आहेत.

एकही कर्मचारी कोरोनाग्रस्त नाही२२ जूनपासून महापालिकेने पूर्ण क्षमतेने कोविड केअर सेंटर सुरू केले. मागील एक महिन्यात रुग्णालयात काम करणारा एकही कर्मचारी कोरोनाग्रस्त झाला नाही. रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले सात ते आठ तरुण स्वयंसेवक म्हणून रुग्णालयात काम करण्यास तयार आहेत. लवकरच त्यांना स्वयंसेवक म्हणून रुग्णालयात काम करण्याची संधी देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद