शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

coronavirus : कोरोना लढ्यासाठी ‘सीएसआर’ मिळेना; बड्या उद्योगांची चालढकल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 7:54 PM

कोरोनाने औरंगाबाद शहराला विळखा घातला असून, औद्योगिक वसाहतीतील बड्या उद्योगांकडून सीएसआरमधून फार मोठी अशी मदत झालेली नाही.

ठळक मुद्देकॉर्पाेरेट आॅफिस ज्या ठिकाणी तेथे काही बड्या उद्योगांनी मदत केली आहेकाहींनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत केली आहे.

औरंगाबाद : कोरोनाविरोधात लढाईसाठी जिल्ह्यातील उद्योगवर्तुळाने आजवर १० कोटींचाही पल्ला गाठलेला नाही. काही बोटावर मोजण्याइतक्याच उद्योगांनी आरोग्य यंत्रणेला बळकट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. बड्या उद्योगांनी चालढकल चालविली असून, ५ मे पासून त्यांना पत्रव्यवहार करूनही प्रशासनाच्या हाती काही पडलेले नसल्याने सीएसआरचा टक्का अद्याप वाढलेला नाही. 

जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये ४ हजारांहून अधिक उद्योगांची संख्या असून, यामध्ये सुमारे २०० बडे उद्योग असे असतील ज्यांची वार्षिक उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे; परंतु काही उद्योगांनी कॉर्पाेरेट आॅफिस जिथे आहे, तेथे सीएसआरमधून मदत करण्याचा प्रकार सुरू आहे. शेंर्द्यातील एका बड्या उद्योग समूहाने तर पुण्यात सुमारे ११५० खाटांचे कोविड हॉस्पिटल सीएसआरमधून उभारल्याची माहिती मध्यंतरी समोर आली होती.

कोरोनाने औरंगाबाद शहराला विळखा घातला असून, औद्योगिक वसाहतीतील बड्या उद्योगांकडून सीएसआरमधून फार मोठी अशी मदत झालेली नाही. कॉर्पाेरेट आॅफिस ज्या ठिकाणी तेथे काही बड्या उद्योगांनी मदत केली आहे, तर काहींनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत केली आहे. औरंगाबादमधील उद्योगवर्तुळातून कररूपाने मोठे उत्पन्न केंद्र आणि राज्य शासनाच्या तिजोरीत जात असेल, परंतु सीएसआररूपाने कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी मदत येथील प्रशासनाला करणे अपेक्षित आहे.

सीएसआरमधून आरोग्यसेवेला बळकटीजिल्ह्यातील उद्योगांनी सीएसआरमधून (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी)  शहर व जिल्ह्यातील आरोग्यसेवेला बळकटी मिळाल्याचा दावा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केला. सीएसआरमधून व्हेंटिलेटर मिळाले, आॅक्सिजन कॉन्सिलेटर मिळाले. निर्जंतुकीकरण करण्यासाठी मनपाने एकही पैसा खर्च केलेला नाही. स्टरलाईट कंपनीने त्यासाठी मदत केली असून, निर्जंतुकीकरणाचा सर्व खर्च सध्या स्टरलाईट करीत आहे. १२५ आॅक्सिजन कॉन्सिलेटर, २० व्हेंटिलेटर स्टरलाईट कंपनीने दिले. विप्रोने ९ पोर्टेबल एक्सरे मशीन दिले. विद्यापीठातील लॅबला आॅरिक सिटीने सव्वाकोटी रुपयांची मदत केली. स्टरलाईटने निर्जंतुकीकरणासाठी पूर्ण जिल्हा दत्तक घेतला आहे. बजाज कंपनीने अद्याप काहीही दिले नाही; परंतु त्यांचे सात ते आठ कोटी रुपयांचे नियोजन आहे. सर्व कोविड सेंटर अपडेट करण्याची त्यांनी तयारी दर्शविली आहे. घाटीतील मशिनरी अपडेट करण्यासाठी बजाजला सांगितले आहे. बागला ग्रुपने मनपा आणि जिल्हा प्रशासनला १२० आॅक्सिजन कॉन्सिलेटर्स दिले आहेत, असे जिल्हाधिकारी म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद