औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना २ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू पावलेल्या एकूण रुग्णांची संख्या ४८६ झाली.
न्यू हनुमाननगर येथील ६५ वर्षीय पुरुष आणि कृष्णानगर येथील ४५ वर्षीय पुरुषाचा २ ऑगस्ट रोजी रात्री घाटी उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
आज जिल्ह्यात ८७ रुग्णांची वाढजिल्ह्यात ८७ रुग्णांचे अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४,६४० एवढी झाली आहे. त्यापैकी १०,९०१ रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४८६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३२५५ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
मनपा हद्दीतील रूग्ण -४९पीरबाजार, उस्मानपुरा १ , पहाडसिंगपुरा १, अमृतसाई प्लाजा, रेल्वेस्टेशन परिसर १, मिल कॉर्नर, पोलिस क्वार्टर १, बन्सीलालनगर ८, पद्मपुरा २, एन दोन, सिडको १, बन्सीलाल नगर २, भीमनगर, भावसिंगपुरा १, ज्योतीनगर १, म्हसोबानगर, जाधववाडी १, विनायकनगर २, सदाशिवनगर ४, ठाकरेनगर २, विश्रांतीनगर २, गजानन कॉलनी १, बालाजीनगर ११, पद्मपुरा १, मिल्क कॉर्नर १, बीड बायपास १, जिल्हा परिषद परिसर १, अन्य ३.
ग्रामीण हद्दीतील रूग्ण-३८सलामपूर, वडगाव १, गणोरी, फुलंब्री ८ उपविभागीय रुग्णालय परिसर, सिल्लोड १, शास्त्री नगर, वैजापूर१, त्रिमूर्ती चौक, बजाजनगर १, वडगाव कोल्हाटी १, सिडको महानगर, वाळूज १, दौलताबाद १, बाजार गल्ली, दौलताबाद १, पाचोड, पैठण ३, खतगाव, पैठण २, मारवाडी गल्ली, गंगापूर ३, लक्ष्मीनारायण नगर, वैजापूर १, शेंडेफळ, वैजापूर १, गायकवाडी, वैजापूर १, दत्त नगर, वैजापूर १, काद्री नगर, वैजापूर १, साळुंके गल्ली, वैजापूर १, लोणी, वैजापूर १, मनूर, वैजापूर १, गुजराती गल्ली, वैजापूर १, मुरारी पार्क, वैजापूर १, डवला, वैजापूर २, जाधव गल्ली, वैजापूर १, अंबेगाव,गंगापूर १.