औरंगाबाद : राहुलनगर, रेल्वेस्टेशन परिसरातील ६० वर्षीय वृद्ध महिलेचा शुक्रवारी (दि. १५) दुपारी साडेतीन वाजता मृत्यु झाला. त्या महिलेचा मृत्युनंतर घेण्यात आलेल्या स्वॅबचा अहवाल शनिवारी पॉझीटीव्ह आला. हा आतापर्यंतचा २६ वा मृत्यू असल्याचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले.
रेल्वेस्टेशन परिसरातील राहुल नगर येथील ६० वर्षीय महिलेला २.४० मिनीटांनी घाटीत गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले होते. त्यांचा साडेतीन वाजता उपचारादरम्यान मृत्यु झाला. त्यांच्या स्वॅबचा अहवाल शनिवारी पाॅझीटीव्ह आला आहे. मधुमेहासोबत कोरोनामुळे दोन्ही बाजुने झालेल्या न्युमोनीयामुळे त्यांचा मृत्यु झाला आहे. असे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
रुग्णसंख्या झाली ९००
शनिवारी सकाळी ३० रुग्णांची वाढ झाल्यानंतर दुपारी आणखी २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे शहरात एकूण बाधितांची सख्या ९०० झाली आहे. दुपारी वाढ झालेल्या २८ रुग्णांत कैलास नगर १, चाऊस कॉलनी १, मकसूद कॉलनी २, हुसेन कॉलनी ४, जाधववाडी १, न्यू बायजीपुरा गल्ली नं.३ येथील १, एन सहा संभाजी कॉलनी सिडको १, कटकट गेट १, बायजीपुरा १०, अमर को ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ सिडको येथील २, लेबर कॉलनी १, जटवाडा १, राहुल नगर १, जलाल कॉलनी १ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये १६ पुरुष आणि १२ महिला रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.