खुलताबाद :जगभरात सध्या कोरोनाने थैमान घातले असून विदेशी नागरिकांना तर सोडाच राज्यातील पुणे , मुंबईत राहत असलेल्या लोकांना ग्रामस्थ गावात प्रवेश देत नाहीत.दरम्यान, वेरूळमध्ये गेल्या काही दिवसापासून विदेशी नागरिक किरायाने घर घेवून राहत असल्याची घटना उघड येताच एकच खळबळ उडाली असून पोलीसांनी घरमालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी की, सध्या जगभरात कोरोनाने दहशत निर्माण केली आहे. अख्खा भारत यामुळे 21 दिवस बंद ठेवण्यात आला आहे. पुणे , मुंबईला असना-या नागरिकांना गावात ग्रामस्थ बिगर तपासणी केल्याशिवाय येवू देईनात पंरतु जगप्रसिध्द वेरूळ गावात गेल्या तीन महिन्यापासून इग्लंड येथील जॉन क्लीन्टन सालमोन हा 70 वर्षीय वृद्ध वेरूळ येथील राजवाडा भागातील शेख नाजीर शेख छोटू याच्या घरात किरायाने वास्तव्यास राहत असल्याची माहिती पोलीस पाटील रमेश ढिवरे यांनी खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सीताराम मेहत्रे यांना दिली.
मेहत्रे यांनी याबाबत तपास करून खातरजमा केली असता सदर विदेशी नागरिकांकडे 14आँक्टोबर 2020 पर्यंत भारतात राहण्याचा व्हिजा आढळून आला. पोलीसांनी घरमालक शेख नाजीर शेख छोटू याच्या विरोधात विदेशी नागरिक घरात भाडेकरू म्हणून राहत असतांना ही माहिती दिली नाही त्याच बरोबर सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्याबद्दल गून्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सीताराम मेहत्रे , नीळकंठ देवरे हे करीत आहे.