ठळक मुद्देशहरात कोरोनाचा धोका वाढत जात आहे
औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी सायंकाळी आणखी ३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५६ झाली आहे.
भीमनगर, भावसिंगपुरा येथील १६ वर्षीय मुलीला, नुर कॉलनी येथील ५ वर्षीय मुलाला, आणि किलेअर्क येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनाचा धोका वाढत असल्याने अधिक चिंता व्यक्त होत आहे.