खुलताबाद : खुलताबाद येथेे हनुमान जयंतीच्या दिवशी भद्रा मारूती मंदीर चोहोबाजूंनी बंद राहणार असून या दिवशी कुठलाही धार्मिक कार्यक्रम होणार नसल्याने भाविकांनी याची नोंद घ्यावी. भाविकांनी जर दर्शनासाठी मंदीरात परिसरात गर्दी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरूध्द पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल गायकवाड यांनी दिली.
खुलताबाद येथे भद्रा मारूतीचे जागृत मंदीर असून हनुमान जयंतीच्या दिवशी मंदीरात पहाटे हनुमान जन्मोत्सव सोहळा होत असतो पंरतू यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भद्रा मारूती मंदीर 18 मार्चपासून भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. 8 एप्रिल रोजी हनुमान जयंती असून हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे कार्यक्रम रद्द करण्यात आले असून भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन तहसीलदार राहुल गायकवाड यांनी केले आहे.
खुलताबाद येथील भद्रा मारूती संस्थानमध्ये आज शनिवार रोजी मंदीर विश्वस्त मंडळाची बैठक होऊन बैठकित कोरणा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे खुलताबाद येथे दरवर्षीप्रमाणे भद्रा मारुती जन्मोत्सवाला भाविकांनी गर्दी करू नये असा आदेश जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांनी दिले आहे. तर सदरील आदेशानुसार जन्मोत्सवाच्या वेळी भाविकांनी कुठल्याही प्रकारचे दर्शन व गर्दी करू नये असे आदेश संस्थानला देण्यात आले आहे. अशी माहिती भद्रा मारुती संस्थान चे अध्यक्ष मिठु पाटील बारगळ ,विश्वस्त माजी खासदार चंद्रकांत खैरे ,आमदार अतुल सावे , कार्याध्यक्ष किशोर अग्रवाल, सचिव कचरू पाटील बारगळ ,भद्रामारूती संस्थांनचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र जोंधळे यांनी माहिती दिली.