औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी ६२ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. उपचार पूर्ण झालेल्या ४३ रुग्णांना सुटी देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील ३ रुग्णांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात आता एकूण रुग्णांची संख्या ४४ हजार ९१३ एवढी झाली आहे. यातील ४३ हजार १४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत १ हजार १८६ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या ५८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ६२ रुग्णांत मनपा हद्दीतील ५०, ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ३४ आणि ग्रामीण भागातील ९ अशा एकूण ४३ रुग्णांना रविवारी सुटी देण्यात आली. न्यायनगरातील ६० वर्षीय स्त्री, सद्गुरू कृपा हाऊसिंग सोसायटीमधील ८७ वर्षीय पुरूष, सम्राटनगरातील ५८ वर्षीय पुरुष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्णसमर्थनगर १, कासलीवाल मार्बल १, रेल्वे स्टेशन परिसर १, सुंदरवाडी २, एचएपी इंटरनॅशनल शाळा परिसर २, गारखेडा १, जबिंदा रेसिडन्सी १, एन ६, संभाजी कॉलनी १, अन्य ३१, एन वन सी. सेक्टर २, बेगमपुरा २, इटखेडा १, व्हीनस सो., बीड बायपास २, साईश्रद्धा एन्क्लेव्ह, नक्षत्रवाडी परिसर १, दर्गा रोड परिसर १.
ग्रामीण भागातील रुग्णपाचोड, पैठण १, यसगाव, खुलताबाद १, अन्य १०