औरंगाबाद : जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या ८७३ स्वॅबपैकी ६४ रुग्णांचे अहवाल रविवारी सकाळी पहिल्या टप्पात पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधितांची संख्या ८२८० झाली आहे.
आतापर्यंत ४८३४ रुग्ण बरे झाले असून ३५० जणांचा मृत्यू झाल्याने ३०९६ जणांवर उपचार सुरु आहेत. रविवारी आढळलेल्या रुग्णांत ३१ पुरूष, ३३ महिला असून ५३ शहरातील तर ११ ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे.
मनपा हद्दीत ५३ रुग्ण
छावणी २, सादात नगर १, गारखेडा १, वसंत नगर १, हनुमान नगर १, शिवाजी नगर १, शिवशंकर कॉलनी १, जाधववाडी १, सुराणा नगर १, रशीदपुरा १, टीव्ही सेंटर १, केसरसिंगपुरा ९, पद्मपुरा १, कैलास नगर १, सिडको एन अकरा २, हडको एन अकरा २, नवनाथ नगर २, रेल्वे स्टेशन परिसर १, रेणुका नगर, गारखेडा १, इंदिरा नगर, गारखेडा ४, एन आठ १, सातारा परिसर १, मुकुंदवाडी १, नक्षत्रवाडी २, गिरिजा विहार, पैठण रोड १, शांतीपुरा १, मिसारवाडी ७, नागेश्वरवाडी २, बाबर कॉलनी २
ग्रामीण भागात ११ रुग्ण
वाळूज एमआयडीसी १, हतनूर, कन्नड १, नरसिंगपूर, कन्नड १, करमाड १, गोदावरी कॉलनी, गंगापूर ४, कुंभार गल्ली, वैजापूर २, मस्की हायवे परिसर, वैजापूर १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.