औरंगाबाद : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १२) सकाळी ९४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. एकूण कोरोनाबाधितांची संख्या २५२४ झाली आहे. यापैकी १३७५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून १०८ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १०२० रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांत कटकट गेट १, समर्थ नगर २, रोशन गेट १, संजय नगर १, संभाजी कॉलनी १, सिल्क मील कॉलनी १, सिडको १, राम नगर १, पीर बाजार २, उस्मानपुरा २, कबीर नगर, सातारा परिसर २, रोशनगेट ४, औरंगपुरा ५, सादात नगर २, बायजीपुरा ३, पुंडलिक नगर ६, सिटी चौक १, जुना बाजार, न्यू वस्ती २, चेतना नगर १, शिवाजी नगर ३, बौद्ध नगर, जवाहार कॉलनी ३, सारंग सोसायटी २, उत्तम नगर १, महेश नगर २, गौतम नगर, जालना रोड १, न्यू हनुमान नगर १, जुना मोंढा, गवळीपुरा १, एन आठ सिडको १, छावणी परिसर १, सुंदरवाडी १, गुलमंडी १, मुजीब कॉलनी, रोशन गेट १, विशाल नगर ३, पटेल नगर २, रेणुका माता मंदिर एन नऊ १, यशोधरा कॉलनी, नेहरु नगर १, रहीम नगर १, भवानी नगर १, साई नगर, एन सहा,सिडको १, खोकडपुरा १, संजय नगर, आकाशवाणी परिसर १, एन तीन सिडको १, सिडको टॉउन सेंटर, एन वन १, संत एकनाथ सोसायटी २, एन चार सिडको १, बारी कॉलनी १, रोजा बाग १, एमजीएम परिसर १, बजाज नगर २ आणि निल्लोड ता. सिल्लोड ३, वैजापूर १, मारीसूरी कॉलनी, गंगापूर १, गणेश नगर, पंढरपूर १, पडेगाव १, कन्नड २, मुकुंदवाडी १, खुलताबाद १, नारेगाव २, कानडगाव १, अन्य २ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ४६ महिला आणि ४८ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.