औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने डाॅक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. त्यातही मृत्यूचे प्रमाण गेल्या काही दिवसांत वाढले आहे. परिणामी, या मृतदेहांचे पॅकिंग करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. परिणामी, ७ ते ८ तास मृतदेह वाॅर्डांतच पडून राहात आहेत. ही परिस्थिती दूर करण्यासाठी माणसांची शोधाशोध करण्याची वेळ घाटी रुग्णालय प्रशासनावर ओढवली आहे.औरंगाबादेत गेल्या ३ आठवड्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या सगळ्यात अत्यवस्थ अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूदरातही वाढ झाली. सरासरी प्रतिदिन २५ ते ३० रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. हे काम घाटीत कंत्राटी तत्त्वावरील संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. मृत्यूचे प्रमाण वाढल्याने मृतदेहाच्या पॅकिंग कामावर परिणाम झाला आहे. मृतदेह पॅकिंग करण्यासाठी ७ ते ८ तासांचा विलंब होत आहे. परिणामी, मृतदेह वाॅर्डातच पडून राहत आहेत. कंत्राटी तत्त्वावर मृतदेहाचे पॅकिंग करण्यासाठी दोन संस्था नियुक्त करण्याची मागणी करण्यात आल्याचे घाटीतील वरिष्ठ डाॅक्टरांनी सांगितले. दोन एनजीओच्या माध्यमातून जिल्हा रुग्णालयात मृतदेहांचे पॅकिंग केले जात आहे. त्यात कोणतीही अडचण नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी म्हणाले.नाशकात नियम डावलून कला केंद्रात छमछम नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील गुरेवाडी शिवारात कोरोना नियमांची पायमल्ली करून व परवाना नसताना पायल कला केंद्रात नृत्यांगणांची छमछम सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी रात्री धाड टाकत मालकासह पाच संशयितांना अटक केली. संशयितांची जामिनावर सुटका करण्यात आली. बंद खोलीत लाऊडस्पीकरच्या आवाजावर अश्लील नृत्य केले जात होते. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर अंधाराचा फायदा घेत अनेकजण पसार झाले. विशाल धोंडीराम मुसळे (रा. पडासाळी, जि. सोलापूर) हा कला केंद्राचा मालक पोलिसांना सापडला.
CoronaVirus News: औरंगाबादमध्ये कोरोना बळींच्या अंत्यसंस्काराला माणसे मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 3:13 AM