शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

coronavirus : आता फक्त ‘हाय रिस्क’ संशयितांचीच होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 5:43 PM

महापालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोरोनाच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांकडे लक्ष

औरंगाबाद : शहरात दररोज ५० ते ६० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. रुग्णसंख्या कशी कमी होईल यावर आता प्रशासकीय यंत्रणेने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला की, त्या भागातील नागरिकांच्या लाळेचे नमुने मोठ्या प्रमाणात घेण्यात येत होते. आता यापुढे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ‘हाय रिस्क’ मंडळींचेच लाळेचे नमुने घेण्यात येणार आहेत.

महापालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कोरोनाच्या कामकाजात बदल करण्यात आला आहे. कालपर्यंत महापालिका ज्या भागात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला त्या भागातील ‘हाय रिस्क’ आणि ‘लो रिस्क’ नागरिकांच्या लाळेचे नमुने घेत होती. ‘लो रिस्क’ गटातील सर्वच नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह येत असले तरी तपासणी यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. महापालिकेकडून दररोज ३०० ते ४०० लाळेचे नमुने जमा करण्यात येत होते. आता नवीन पद्धतीनुसार लाळेचे नमुने घेण्याचे प्रमाण आपोआपच कमी होणार आहे. 

रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांसह आसपासच्या प्रमुख नागरिकांच्या लाळेचे नमुने घेतले जाणार आहेत. इतर संशयितांना घरातच विलगीकरण करून ठेवण्यात येईल. त्यांच्यामध्ये कोरोनासंदर्भातील काही लक्षणे दिसून आल्यास त्वरित लाळेचे नमुने घेण्यात येतील. विलगीकरण करून ठेवलेल्या नागरिकांवर महापालिका वॉच ठेवणार असल्याचे सूत्रांनी नमूद केले.

९००० लाळेचे नमुने घेतलेघाटी रुग्णालय आणि एमजीएम स्पोर्टस् कॉम्प्लेक्स येथे दररोज पंधरा ते अठरा नागरिकांच्या लाळेचे नमुने घेण्यात येत आहेत. लाळेचे नमुने घेण्यासाठी महापालिकेने घाटी रुग्णालयाकडून काही डॉक्टर मागविले आहेत. या डॉक्टरांचे वेगवेगळे पथक तयार करून महापालिका दररोज ३०० ते ४०० नागरिकांच्या लाळेचे नमुने घेत आहे. आतापर्यंत शहरात ९ हजारापर्यंत लाळेचे नमुने घेण्यात आले आहेत.

५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांकडे लक्ष५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांकडे आता महापालिकेने अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या लाळेचे नमुने न घेता किमान स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना थोडाफार त्रास आहे त्यांना वैद्यकीय उपचार देण्यात येणार असल्याचे महापालिकेतील वरिष्ठ सूत्रांनी नमूद केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद