औरंगाबाद : मंगळवारी सकाळी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शहरात आणखी एका रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. बायजीपुऱ्यातील एक रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.व्ही. कुलकर्णी यांनी दिली.
कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होणे सुरूच असून, मंगळवारी सायंकाळी बायजीपुऱ्यातील १७ वर्षीय मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी दिली. यासोबतच शहरातील रुग्णसंख्या २५ वर गेली आहे.
दरम्यान, २ एप्रिल रोजी पुण्याहून आलेल्या ३९ वर्षीय तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर ६८ वर्षीय व्यक्तीचा सोमवारीच अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू होते घाटी रुग्णालयात ते उपचारासाठी ८ एप्रिल रोजी दाखल झाले होते. त्यांचा तपासणीचा अहवाल ९ एप्रिल रोजी निगेटिव्ह आला होता. त्यांचा ११ एप्रिल रोजी पुन्हा स्वब घेण्यात आला. हा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. रुग्ण व्हेंटिलेटरवर होता.उपचारा दरम्यान त्याचा मंगळवारी मृत्यू झाला.