- योगेश पायघनऔरंगाबाद: कोरोना पॉझिटिव्ह महिलेची नैसर्गिक प्रसूती घाटी रुग्णालयात शनीवारी पार पडली. बायजीपुरा इंदिरानगर येथील 28 वर्षीय महिलेला कन्यारत्न प्राप्त झाले बाळ बाळंतीण सुखरूप आहे अशी माहिती अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांनी दिली.
घाटीचे स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले, कंटेन्मेंट झोन मधून येणाऱ्या महिलांची स्वब टेस्ट गेल्या आठवडाभरापासून करण्यात येत होती. आता पर्यंत 30 महिलांचे अहवाल निगेटिव्ह आले. शनिवारी 28 वर्षीय महिला पहिल्या प्रसूतीसाठी भरती झाली होती. शनिवारी पथक चारच्या डॉ प्रशांत भिंगारे व सहकारी डॉक्टरांनी तिची नैसर्गिक प्रसूती केली. 2.8 किलो वजन असलेली कन्यारत्न जन्मले आई आणि बाळ दोन्ही सुखरूप आहेत. त्या महिलेचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाला. तो अहवाल पॉझिटिव्ह असल्याने महिलेला कोरोना क्रिटिकल हॉस्पिटलला हलवण्यात आले. डॉ लक्ष्मीकांत देशमुख, डॉ अमोल जोशी बाळाची काळजी घेत आहे.
शहरात यापूर्वी एक पॉझिटिव्ह महिलेची सिझेरियन प्रसूती राज्यातील पहिली प्रसूती ठरली होती. ती महिला करोना मुक्त झाली. आता पॉझिटिव्ह महिलेची नैसर्गिक प्रसूती मराठवाड्यातील पहिली प्रसूती ठरली आहे.