ठळक मुद्दे१८ एप्रिलला पॉझिटिव्ह महिलेची झाली प्रसूतीबाळास संसर्ग व्होऊ नये म्हणून वेगळे ठेवलं
औरंगाबाद : आठवडाभरापूर्वी प्रसूती झालेल्या बायजीपुऱ्यातील कोरोनाबाधित महिलेचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालयात गत आठवड्यात १८ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सिजर प्रसूती यशस्वी झाली. या महिलेने मुलीला जन्म दिला आहे. आईपासून संसर्ग होऊ नये, यासाठी बाळाला नवजात शिशू विभागात ठेवण्यात आले आहे. या महिलेचा आता दुसरा अहवाल तपासण्यात येणार आहे. हा अहवालही निगेटिव्ह आल्यास या आई आणि नवजात मुलीची भेट होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.