औरंगाबाद : शहरातील पाच भागात नवे 23 कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यांचे अहवाल शनिवारी सकाळी मिळाले. त्यात नूर कॉलनी 5, बायजीपुरा 11, कैलाशनगर 3, समतानगर 2, जयभीमनगर येथील 2 बाधीत रुग्णाचा समावेश आहे. असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासंख्या 239 वर पोहचली आहे. शुक्रवारी दिवसभरात 39 रुग्णाची वाढ झाली त्यामुळे आकडा 216 होता. 239 मधील 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 24 जण कोरोनामुक्त झाले आहेत.