औरंगाबाद : औरंगाबादेत आणखी ६ रुग्ण पॉझिटिव्ह कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात दाखल ६ जणांचा १४ दिवसांचा उपचार कालावधी पुर्ण झाला आहे. या सहाही जणांचा दुसरा अहवाल गुरुवारी रात्री उशीरा निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. यामुळे शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २२ वर गेली आहे. सर्व सहा जणांना शुक्रवारी दुपारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
शहरात आतापर्यंत ४० जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातील १४ व खासगी रुग्णालयातील २ जणांनी कोरोनावर मात केली होती. आता जिल्हा रुग्णालयातील आणखी ६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या विळख्यात शहराला दिलासा मिळाला आहे. कोरोना हा बरा होतो नव्हे , तर बरा झाला, हे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी करून दाखविले.
५० टक्क्यांवर बरे
शहरात ४० पैकी २२ रुग्ण उपचारामुळे कोरोना कोरोनातून बाहेर पडले आहे. त्यामुळे बधितपैकी ५० टक्क्यांवर रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे दिसून येते.