औरंगाबाद ः पुंडलीकनगर येथील 58 वर्षीय व्यक्तीचा सोमवारी दुपारी साडेचार वाजता मृत्यू झाला. गेल्या पंधरा तासातील हा दुसरा मृत्यू असून शहरातील हा 15 वा मृत्यू आहे. अशी माहीती डाॅ. अरविंद गायकवाड यांनी दिली.
रविवारी जिल्हा रुग्णालयातून त्यांना घाटीत पहाटे अडीच वाजता हलवण्यात आले होते. मेंदु्चा टिबीसह त्यांना इपिलीप्सी व फुफ्फुसाचा एक भाग शस्त्रक्रीयेने काढण्यात आलेला होता. त्यांना भरती केल्यापासून व्हेटीलेटरवर ठेवण्यात आले होते. तर झटके आल्यामुळे त्यांचा साडेचार वाजता मृत्यू झाल्याचे डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य यांनी माहिती दिली.
दरम्यान, जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ५० रुग्ण वाढल्यावर सोमवारी सकाळीच तब्बल ६१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ६१९ झाली आहे. आज वाढलेल्या रुग्णात रामनगर 22, एस आरपीएफ जवान १, सदानंदनगर 8, किलेअर्क ८, न्यायनगर २, दत्त नगर कैलास नगर ५ , भवानी नगर जुना मोंढा 3, पुंडलिक नगर गल्ली 1 , एन 4 सिडको, बायजीपुरा, संजयनगर, कैलासनगर, बीड बायपास, कोतवालपुरा, सातारा गाव येथील प्रत्येकी एक व फुलशिवरा गंगापूर येथील 4 रुग्णांचा समावेश आहे.
चार दिवसात २४१ रुग्णांची भरशहरात रविवारी सकाळच्या सत्रात सात भागातील ३७ रुग्ण आढळल्यावर दुपारच्या सत्रात १३ रुग्णांची भर पडत दिवसभरात रुग्णसंख्या ५० तर एकुण बाधितांची संख्या ५५८ झाली होती. मागील चार दिवसात शहरात शुक्रवारी १०० , शनिवारी ३० आणि रविवारी ५० , सोमवारी सकाळी ६१ अशा तब्बल २४१ रुग्णांची भर पडल्याने शहरवासीयांना मोठा धक्का बसला आहे.