औरंगाबाद : घाटी रुग्णालयात जिल्ह्यातील चार तर बीड व चाळीसगांव (जि. जळगांव) येथील प्रत्येकी एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर आणखी २७ रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५,५६७ झाली आहे. त्यापैकी ११, ५२१ बरे झाले तर ५०७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३,५३९ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यातील ४९ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. तर तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर शिऊर (ता. वैजापुर) येथील ८२ वर्षीय वृद्ध, पाडळी बोरगांव (ता. फुलंब्री) येथील ५१ वर्षीय पुरुष, शिवनगर कन्नड येथील ७४ वर्षीय पुरुष, संघर्षनगर मुकुंदवाडी येथील ५३ वर्षीय महिला, चाळीसगांव येथील ६८ वर्षीय पुरुष तर गजानन नगर बीड येथील ४३ वर्षीय बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. यामुळे दुपारपर्यंत एकूण ९ बाधितांचा मृत्यू झाला तर ७६ रुग्णांची भर पडली आहे.
आणखी २७ कोरोनाबाधितांची वाढमनपा हद्दीतील १६ :शंकुतला नगर, गादिया कॉलनी १, गारखेडा परिसर १, लक्ष्मी नगर, गारखेडा परिसर १, प्रोझोन मॉलच्या मागे, चिकलठाणा १, ब्ल्यू बेरी २, वृंदावन कॉलनी १, गरम पाणी १, शमी कॉलनी १, अन्य ५, विश्वकर्मा सो., एन आठ, सिडको १, कोहिनूर कॉलनी १.
ग्रामीण भागातील ११ रुग्ण :खंडाळा १, खालचा पाडा, शिवूर ९, बजाज नगर, वडगाव कोल्हाटी १.