औरंगाबाद : शहरात सोमवारी (दि. १५) पहाटे तासाभरात कोरोना पॉझिटिव्ह दोन पुरुषांसह एक वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तर सकाळी ५० बाधित आढळल्यानंतर दुपारी आणखी ६ बाधितांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या २८१२ झाली आहे. तर आतापर्यंत १५३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
घाटीत उपचार सुरू असताना मन्सूर कॉलनीतील ६० वर्षीय पुरुष रुग्णाचा सोमवारी पहाटे ४.१५ वाजता, रोशन गेट येथील ५६ वर्षीय पुरुष रुग्णाचा पहाटे ५ वाजता, तर शिवशंकर कॉलनी येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेचा सकाळी ५.१५ वाजता कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यापैकी दोन्ही वृद्ध व्यक्तिंना मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होता. ५६ वर्षीय व्यक्तीला इतर आजार नव्हते , अशी माहिती घाटी प्रशासनाने दिली.
येथे आढळेल रुग्ण नारेगांव १, पवननगर, टिव्ही सेंटर २, एस.टी. कॉलनी, एन-२ येथे १, गल्ली नं ४, गजानननगर ४, सुतगिरणी, गारखेडा परिसर १, नवजीवन कॉलनी, एन-११ येथे १ , एन-८, सिडको ३, मोतीवालानगर १, एन-९ सिडको १, कोतवालपुरा १, आझाद चौक १, मंजुरपुरा १, आसेफिया कॉलनी १, नुतन कॉलनी १, एन-६ सिडको २, सिटी चौक १, गुलमंडी १, कैलासनगर १, मिल कॉर्नर १, बजाजनगर २, अंबिका नगर ५, आंबेडकर नगर ६, हर्सुल परिसर २, बारी कॉलनी १, सिव्हील हॉस्पीटल परिसर १, जयसिंगपुरा १, छावणी १, बायजीपुरा १, बंजारा कॉलनी १, पळशी १, मुजीब कॉलनी १, सोयगांव १, हर्ष नगर १, दुधड ४, अन्य १. यामध्ये २१ महिला व ३५ पुरूष रुग्णांचा समावेश आहे.