शहरं
Join us  
Trending Stories
1
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
3
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
4
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर
5
BBA चं शिक्षण आणि व्यवसायाचं स्वप्न...; पैसे नव्हते म्हणून ६० लाखांची BMW घेऊन झाला फरार
6
छत्तीसगडच्या सुकमात भीषण चकमक; 10 नक्षलवाद्यांचा खात्मा, ओख-47 सह अनेक शस्त्रे जप्त
7
अंबरनाथच्या उच्चभ्रू सोसायटीतील घटना; कुमारी मातेने इमारतीतून फेकले अर्भक
8
WhatsApp चं अप्रतिम फीचर! आता व्हॉईस नोट्स टेक्स्टमध्ये बदलता येणार; जाणून घ्या, कसं?
9
नसीम खान यांच्या कार्यालयाबाहेर संशयास्पद हालचाली, दोघं ताब्यात; मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह चॅट
10
IPL 2025 कधीपासून सुरु होणार? BCCI ने पुढील ३ वर्षांच्या तारखा करून टाकल्या जाहीर
11
Wipro Bonus Shares : १४ व्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज कंपनी, ५ डिसेंबर पूर्वी रेकॉर्ड डेट
12
निकालांआधीच मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू; महायुती, मविआमधील या  नेत्यांची नावं चर्चेत
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मुख्यमंत्री मुंबईतच ठरणार', काँग्रेसच्या हायकमांडला संजय राऊतांचं आव्हान
14
Vikrant Massey : "ते टीव्ही स्टार्सला कमी लेखतात"; विक्रांत मेस्सीने इंडस्ट्रीतील मोठ्या स्टार्सची केली पोलखोल
15
१० मोठ्या मालमत्ताधारकांकडे ६०० कोटी रुपयांची थकबाकी; BMC ने दिला इशारा
16
IPL 2025: लिलावात 'या' भारतीय खेळाडूवर लागेल २५-३० कोटींची बोली; Mr. IPL ची भविष्यवाणी
17
धनुष-नयनतारा आमने सामने! ३ सेकंदाच्या व्हिडिओवरुन सुरु आहे वाद; एकाच रांगेत बसले अन्...
18
IND vs AUS : अवघ्या १५० धावांत टीम इंडिया All Out; पदार्पणात Nitish Reddy ची लक्षवेधी खेळी
19
या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी
20
जगातील सर्वात महाग कॉफी! महिन्याचा पगारही कमी पडेल, विकणारा आहे शेतकरी

coronavirus : बालरुग्णांनी पालकांशिवाय घेतले उपचार; रुग्णालयात दाखवली लढाऊ वृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 1:41 PM

औरंगाबादेत आतापर्यंत निदान झालेल्या कोरोनाबाधितांमध्ये जवळपास ८ टक्के रुग्ण हे १० वर्षांखालील बालके आहेत.

ठळक मुद्देआई-वडील पॉझिटिव्ह, नातेवाईक क्वारंटाईन डॉक्टर, परिचारिका बनले बालरुग्णांचे पालक

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : वय जेमतेम १२ वर्षे. खेळण्या-बागडण्याचे दिवस. मात्र, याच वयात कोरोनाला सामोरे जाण्याची वेळ ओढवली. सारे जग कोरोनामुळे हादरलेले व सोबत आई-वडील नसतानाही अगदी हसत-खेळत  एकट्याने उपचार घेतले आणि कोरोनावर मात केली. हीच लढाऊ वृत्ती दिसली रुग्णालयात एकट्याने उपचार घेतलेल्या अनेक बालकांमध्ये.

औरंगाबादेत आतापर्यंत निदान झालेल्या कोरोनाबाधितांमध्ये जवळपास ८ टक्के रुग्ण हे १० वर्षांखालील बालके आहेत. यात बहुतांश बालकांचे आई, वडील आणि नातेवाईक पॉझिटिव्ह अथवा क्वारंटाईन. अशा परिस्थितीत रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारीच पालक बनून बालकांची काळजी घेत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या १२ वर्षांखालील १८ बालके उपचारासाठी दाखल आहेत. शहरात २२ मेपर्यंत १० वर्षांच्या आतील कोरोना पॉझिटिव्ह बालरुग्णांची  संख्या ही १०५ इतकी होती. 

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. एखाद्या घरात रुग्णाचे निदान पॉझिटिव्ह होते, तेव्हा घरातील अन्य लोकांची तपासणी केली जाते. त्यात लहान मुलांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. शहरात पॉझिटिव्ह मुलांच्या उपचारासाठी निगेटिव्ह पालक स्वत:च्या जिवाची पर्वा न करता रुग्णालयात थांबल्याचे पाहावयास मिळाले; परंतु आई, वडील, अन्य नातेवाईक पॉझिटिव्ह,  क्वारंटाईन असल्याने मुलांच्या उपचारासाठी अनेक अडचणी उभ्या राहत असल्याचे दिसून येत आहे. एकाच रुग्णालयात पॉझिटिव्ह पालकही असतील, तर मुलांची काळजी घेता येते; परंतु मुले एका रुग्णालयात आणि पालक अन्य रुग्णालयात, अशीही परिस्थिती आहे. त्यामुळे मुलांच्या उपचाराची कसोटी डॉक्टर, परिचरिकांना पार पाडावी लागत आहे.

जे पालक मुलांसोबत थांबतात, त्यांचे समुपदेशन करून नेमकी कोणती काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले जाते, तर अनेक मुलांसोबत कोणीही नव्हते.  त्यांची डॉक्टर, परिचारिकांनीच काळजी घेतली आणि घेत आहेत. जिल्हा रुग्णालयात मुलांना चित्रकलेचा छंद जोपासण्यास सांगितले जात आहे. काळजीपोटी कुटुंबीय फोनवरून  डॉक्टरांकडे मुलांविषयी विचारणा करतात, तेव्हा डॉक्टर मुलांविषयी माहिती देऊन त्यांचे समाधान करतात. डॉक्टर, परिचारिकांच्या पाठबळावर अनेक मुलांनी रुग्णालयात एकटेच राहून कोरोनावर विजय मिळविला. घाटीत कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या प्रसूतीनंतर डॉक्टर, परिचारिकाच नवजात शिशूची काळजी घेतात.

पालकांशिवाय घेतले उपचारअनेक बालकांनी सोबत पालक नसताना यशस्वी उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. मुले हे खूप धावपळ करीत असतात. त्यांना खेळायचे असते. या सगळ्या गोष्टींबरोबर उपचार अधिक महत्त्वाचा असतो. त्यामुळे यासाठी अनेक माध्यमांतून प्रयत्न केला जातो.-डॉ. भारती नागरे, बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय

दूध हे बाळासाठी महत्त्वपूर्ण पॉझिटिव्ह गरोदर मातेच्या प्रसूतीनंतर शिशूची तपासणी केली जाते. आई पॉझिटिव्ह आणि नातेवाईक क्वारंटाईनमध्ये असतात. त्यामुळे डॉक्टर, परिचारिकाच शिशूची काळजी घेतात. आईचे दूध हे बाळासाठी महत्त्वपूर्ण आहे. योग्य काळजी घेऊन त्यास दूध पाजले जाते.-डॉ. एल.एस. देशमुख, नवजात शिशू विभागप्रमुख, घाटी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद