औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळासमोरील मनपाच्या कोविड रुग्णालयातील दोन डॉक्टर पॉझिटिव्ह आल्याने मनपाची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. इतर डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना काळजी घेऊन काम करण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मागील दोन महिन्यांपासून याठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काही डॉक्टर आणि कर्मचारी दोन मास्क लावून रुग्णालयात आरोग्य सेवेचे काम करीत होते. त्यातील दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्यावर त्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही डॉक्टरांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. बुधवारी मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी रुग्णालयात जाऊन दोन्ही डॉक्टरांची भेट घेतली. आस्थेवाईकपणे त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत आराम करण्याचा सल्लाही दिला.