औरंगाबाद : शहरात कोरोनामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाल्याचे बुधवारी समोर आले. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनामुळे मयत रुग्णांची एकूण संख्या ११८ झाली आहे.
भावसिंगपुरा येथील ७९ वर्षीय महिला आणि दिलरास बिस्मिल्लाह कॉलनी येथील ५५ वर्षीय पुरुषाचा उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. भावसिंगपुरा येथील महिलेस ४ जून रोजी घाटीत दाखल करण्यात आले होते. ५ जून रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री १०.२० त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर दिलरास बिस्मिल्लाह कॉलनी येथील रूग्ण मंगळवारीच घाटीत दाखल झाले होते. उपचार सुरू असताना दुपारी १.५५ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले.