औरंगाबाद/बीड/नांदेड/परभणी : मराठवाड्यात बुधवारी कोरोनाचे रुग्ण वाढले. औरंगाबाद जिल्ह्यात १२३, नांदेड जिल्ह्यात ९९, बीडमध्ये ९०, परभणी जिल्ह्यात २३ पॉझिटिव्ह आढळले. शिवाय परभणी जिल्ह्यात चार, औरंगाबाद जिल्ह्यात तीन आणि नांदेड जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला.नांदेड जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे ९९ बाधित आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे़ त्यामुळे रुग्णसंख्या आता ३ हजार ६१७ झाली असून १२९ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे़बीड जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा ९० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २१३७ एवढी झाली आहे. जिल्ह्यात मृतांची संख्या ५२ झाली आहे. परभणीत बुधवारी महानगरपालिकेने केलेल्या रॅपिड टेस्टमध्ये २३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दिवसभरात ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला़ जिल्ह्यात आता बळींची संख्या ६१ वर पोहोचली आहे़औरंगाबाद जिल्ह्यात १२३ बाधितांची भरऔरंगाबाद जिल्ह्यात १२३ बाधितांची बुधवारी भर पडली, तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १७,४२७ एवढी झाली आहे. त्यापैकी १२,८३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ५६५ बाधितांचा मृत्यू झाला असून, सध्या ४,०२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत
CoronaVirus News: मराठवाड्यात कोरोनाचे नवे ३३५ रुग्ण; बुधवारी १० जाणांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 2:32 AM