जळगाव रोडच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी
औरंगाबाद : सिडको बस स्थानक ते हर्सूल रोडच्या डागडुजीसाठी स्वतंत्र निधी देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आली. सुभेदारी विश्रामगृह येथे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. जळगाव रोडवर मोठमोठे खड्डे पडले असून शहरातील हा मुख्य रस्ता आहे. शासनाने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती किंवा संपूर्ण डांबरीकरण करावे. मुकुंदवाडी ते बाळापूर या रस्त्याची मागणीही यावेळी केली. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम उस्मानी, माजी आ. सुभाष झांबड, मनपाचे माजी गटनेते भाऊसाहेब जगताप, अनिता मोहन साळवे, बाळू गुजर, अशोक डोळस, बबन जगताप, पप्पू ठुबे, राहुल सावंत, प्रकाश सानप, भारत जावळे, भागचंद शिंदे, अनिल जगताप, भारत जावळे, कांता रणभरे, राजू शिंदे आदींची उपस्थिती होती.