लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तालुक्यातील म्हाळस जवळा येथील नारायण उर्फ वैभव राऊत यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेला मुख्य आरोपी राष्ट्रवादीचा नगरसेवक संतोष गायकवाड याला पिंपळनेर पोलिसांनी रविवारी बारामतीत बेड्या ठोकल्या. वैभव यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन व त्यांच्या पत्नी तसेच भावाच्या जवाबावरुन पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नगरसेवकाला बारामतीत बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:22 AM