शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

लाचखोर तहसीलदार किशोर देशमुखची एसीबीकडून उघड चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 6:19 PM

Corrupt Tehsildar Kishor Deshmukh's open inquiry by ACB देशमुखला लाच घेताना पकडल्यामुळे देशमुख याने लाचखोरीतून कुठे आणि किती मालमत्ता खरेदी केल्या याविषयीची चौकशी करण्याचा निर्णय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतला.

ठळक मुद्देपोलीस आणि महसूल विभागाला हफ्ते दिल्याशिवाय वाळू वाहतूक करणे अशक्य असल्यामुळे वाळूचे दर ८ हजार रुपये प्रतिब्रासपर्यंत गेले आहेत. या उघड चौकशीत जर देशमुखकडे त्याच्या उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती आढळून आली तर त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा दुसरा गुन्हा दाखल केला जाईल.

औरंगाबाद : वाळू ठेकेदाराकडून दीड लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या अप्पर तहसीलदार किशोर देशमुखची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उघड चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाळू व्यावसायिकांचे जप्त केलेले दोन हायवा ट्रक सोडविण्यास मदत करण्यासाठी आणि विनाअडथळा वाळू वाहतूक करू देण्याकरिता अप्पर तहसीलदार किशोर देशमुख याला दीड लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. एक दिवस पोलीस कोठडीत राहिल्यावर न्यायालयाने देशमुखची बुधवारी हर्सूल कारागृहात रवानगी केली. या कारवाईने महसूल विभागातील हफ्तेखोरी चव्हाट्यावर आली. महसूल विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून अवैध वाळू वाहतूक बिनबोभाट सुरू असल्याचे पुन्हा समोर आले. पोलीस आणि महसूल विभागाला हफ्ते दिल्याशिवाय वाळू वाहतूक करणे अशक्य असल्यामुळे वाळूचे दर ८ हजार रुपये प्रतिब्रासपर्यंत गेले आहेत. 

देशमुखला लाच घेताना पकडल्यामुळे देशमुख याने लाचखोरीतून कुठे आणि किती मालमत्ता खरेदी केल्या याविषयीची चौकशी करण्याचा निर्णय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतला. पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी याविषयी सांगितले की, देशमुख हा शासकीय सेवेत रुजू झाल्यापासून आजपर्यंत त्याने कुठे नोकरी केली. त्याला किती वेतन मिळाले आणि आज त्याच्याकडे असलेली मालमत्ता, याविषयी तपास केला जाईल. या उघड चौकशीत जर देशमुखकडे त्याच्या उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती आढळून आली तर त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा दुसरा गुन्हा दाखल केला जाईल.

देशमुखचा ऑपरेटर शोधण्याची रिपाइंची मागणीरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे मराठवाडा युवक अध्यक्ष नागराज गायकवाड यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी एसीबीचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यात त्यांनी नमूद केले की, देशमुखला दीड लाख रुपये लाच घेताना पकडण्यात आले. देशमुखचा पाठीराखा जिल्हाधिकारी कार्यालयातील सुपर क्लास वन अधिकारी आहे. यामुळे देशमुखच्या काळ्या कारनाम्यावर सतत पडदा टाकला जातो. यामुळे यादृष्टीने तपास करावा, अशी मागणी केली. 

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागAurangabadऔरंगाबाद