डॉ. दहिफळे फॅमिली डॉक्टर
डॉ. उज्वला दहिफळे या शहरातील असंख्य कुटुंबांच्या फॉमिली डॉक्टर बनल्या आहेत. हे कुटुंब असे आहे की, कोणत्याही आजारावर उपचार करण्यापूर्वी सर्वप्रथम डॉ. दहिफळे यांच्याशी चर्चा करतात. त्यांच्या सल्ल्यानुसारच मग त्यांना जिथे सोयीस्कर वाटेल, त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. त्या असंख्य कुटुंबांसाठीही फॅमिली डॉक्टरच बनल्या आहेत. त्यांच्या सुख-दु:खातही त्या सहभागी होतात. असंख्य कुटुंबांचा माझ्यावरील विश्वास मला रुग्णसेवा करण्यासाठी बळ देत असतो, असे डॉ. उज्वला दहिफळे यांनी सांगत सर्वांचे आभार मानले.
चौकट
मेडिकल टुरिजमला प्रोत्साहनाची गरज
औरंगाबादेत लहान-मोठी नामांकित हॉस्पिटल्स आहेत. सर्वजण माफक दरात रुग्णसेवा करीत आहेत. अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञान येथे उपलब्ध आहे. त्या दर्जाचे तज्ज्ञ डॉक्टर शहरात २४ तास उपलब्ध आहेत. यामुळे देशातीलच नव्हे, तर विदेशातील रुग्ण शहरात उपचारासाठी येत असतात. देश-विदेशातील रुग्णांमध्ये खात्रीशीर उपचाराचा विश्वास येथील डॉक्टरांनी निर्माण केला आहे. खासगी हॉस्पिटलसोबत जिल्हा प्रशासनाने सहकार्य केल्यास मेडिकल टुरिजम आणखी वाढेल व त्याचा फायदा शहराला होईल.
डॉ. उज्वला दहिफळे
प्लास्टिक सर्जन