बापू सोळुंके
औरंगाबाद : महामार्गावर वाहने सुसाट पळविणे आता चांगलेच अंगलट येऊ शकते. महामार्ग सुरक्षा पोलीस विविध रस्त्यावर स्पीड गन यंत्राद्वारे धावत्या वाहनांचा वेग मोजून सुसाट वाहनचालकांना ऑनलाइन ई-चालान पाठवीत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील ८ हजार ६८३ वाहनचालकांना वेगमर्यादेचे पालन न केल्याची किंमत म्हणून ८४ लाख ८१ हजार रुपये शासनाला भरावे लागणार आहेत. जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीतील ही कारवाई असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
दरवर्षी औरंगाबाद जिल्ह्यात रस्ता अपघातात सरासरी ६०० हून अधिक नागरिकांचा बळी जातो. विशेषत: महामार्गावरील वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याने अपघाताचा धोका वाढतो. महामार्गावरील बहुतेक अपघात वाहनांच्या वेगामुळे झाल्याचे दिसून येते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने महामार्गावर वाहनांची वेगमर्यादा निश्चित केली आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर इंटरसेप्टर स्पीड गनद्वारे कारवाई केली जाते. औरंगाबाद जिल्ह्यात महामार्ग पोलिसांकडून यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत वेगमर्यादा न पाळणाऱ्या ८ हजार ६८३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून त्यांच्याकडून तडजोड रक्कम म्हणून ८४ लाख ८१ हजार रुपये आकारण्यात आओ. ई-चालान पद्धतीने आकारण्यात आलेला हा दंड वाहनचालकांकडून वसूल करण्यात येतो.
अशी झाली कारवाई
महिना- वाहनांची संख्या- -----तडजोड रक्कम(दंड)
जानेवारी-------- ८१९-------------७७ लाख ६००० रुपये
फेब्रुवारी-
मार्च-
एप्रिल-
मे-
जून-
जुलै-
ऑगस्ट-८१९-------------७७ लाख ६००० रुपये-------------------
चौकट
धावत्या वाहनांचा मोजला जातो वेग
महामार्गावर वेगमर्यादा न पाळणाऱ्या धावत्या वाहनांचा वेग मोजला जातो. मर्यादेपेक्षा अधिक वेगात असलेल्या वाहनांवर महामार्ग सुरक्षा पोलीस इंटरसेप्टर वाहनांतील स्पीड गन यंत्राद्वारे कारवाई करतात. धावत्या वाहनांचा वेग ३०० मीटर अंतरावरून या यंत्राद्वारे मोजला जातो. अशा वाहनाला पोलीस न थांबविता ऑनलाइन चालान करतात, अशी माहिती महामार्गच्या पोलीस निरीक्षक नंदिनी चांदपूरकर यांनी दिली.
-------------------
कारवाईचा मेसेज येतो मोबाइलवर
वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर ऑनलाइन कारवाई होताच या कारवाईचा मेसेज वाहनमालकाच्या मोबाइलवर पाठविला जातो. पोलिसांनी ऑनलाइन कारवाई केल्याचा मेसेज प्राप्त झाल्यावर आपल्या वाहनाने वेगमर्यादा पाळली नसल्याचे वाहनचालकाच्या लक्षात येते.