शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
आजचे राशीभविष्य १० ऑक्टोबर २०२४; आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा
4
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
5
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
6
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
7
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
8
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
9
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
10
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
11
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
12
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
13
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
14
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
15
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
16
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
17
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
18
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
19
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

कापूस उत्पादन घटले, १०० सूत गिरण्या बंद 

By बापू सोळुंके | Published: December 31, 2023 9:21 AM

...परिणामी, मागील दहा वर्षांत मराठवाड्यातील सुमारे १०० जिनिंग प्रेसिंग बंद पडल्याची धक्कादायक माहिती आहे. 

छत्रपती  संभाजीनगर : पांढरे सोने म्हणून शेतकऱ्यांची कापूस लागवडीला पहिली पसंती असायची. मात्र, गेल्या काही वर्षांत कापसाचा उत्पादन खर्च दरवर्षी वाढतच आहे, त्या प्रमाणात कापसाचे दर न वाढल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कापसाऐवजी सोयाबीनला पसंती दिली. परिणामी, मागील दहा वर्षांत मराठवाड्यातील सुमारे १०० जिनिंग प्रेसिंग बंद पडल्याची धक्कादायक माहिती आहे. 

 मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये दरवर्षी खरीप हंगामात सरासरी  ४८ लाख ३० हजार ८५३ हेक्टरवर पेरणी केली जाते.  १० वर्षांपूर्वी मराठवाड्यातील ६० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड व्हायची. तेव्हा मुबलक प्रमाणात कापसाचे उत्पादन होत. शेतकऱ्यांकडून शासनच कापूस खरेदी करीत होते. तेव्हा खासगी व्यापाऱ्यांना कापूस खरेदीची परवानगी नव्हती. 

व्यापाऱ्यांना कापूस खरेदीची परवानगी देण्यात आल्यानंतर येथील व्यापारी मध्य प्रदेशातील खंडवा येथे मोठ्या प्रमाणात असलेल्या जिनिंग प्रेसिंग चालकांना कापूस नेऊन विकत असत. मराठवाड्यात मुबलक प्रमाणात कापूस उपलब्ध होत असल्याने दहा ते पंधरा वर्षांपूर्वी येथे सुमारे १५० हून अधिक जिनिंग, प्रेसिंग उभ्या राहिल्या होत्या. यात काही सहकारी सूतगिरण्यांही होत्या. कापसाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसल्याने शेतकरी सोयाबीनकडे वळले असून कापसाचे उत्पादन २८ टक्क्यांपर्यंत कमी झाले. 

टॅग्स :cottonकापूसbusinessव्यवसाय