शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

"संस्कृत शिकता आले नाही, ही आयुष्यात राहून गेलेेली गोष्ट..."

By शांतीलाल गायकवाड | Published: August 10, 2024 12:44 PM

‘समीक्षेची प्रतिमासृष्टी’ साकारणारे ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांचे ९१ व्या वर्षात पदार्पण; ‘लोकमत’शी दिलखुलास संवाद

शांतीलाल गायकवाड -छत्रपती संभाजीनगर : हजारो प्रतिभावान विद्यार्थी घडविणारे मराठी भाषेचे शिक्षक व मराठी वाङ्मयात ‘समीक्षेची प्रतिमासृष्टी’ निर्माण करणारे तपस्वी डॉ. सुधीर रसाळ हे शनिवारी (दि. १० ऑगस्ट) वयाची नव्वदी पूर्ण करीत आहेत. कठोर परिश्रम व सचोटीने क्षेत्रात आपले आगळेवेगळे ‘प्रतिष्ठान’ निर्माण करणाऱ्या शेकडो मानसन्मान प्राप्त सरांना आपण संस्कृत शिकू शकलो नाही याची आजही खंत वाटते. 

रसाळ सरांचा नव्वदीतही तोच जोम व जोश हा सळसळत्या तारुण्यालाही लाजविणाराच. आजही नित्यनेमाने त्यांचे वाचन, लेखन सुरू आहे. शतकी वाटचालीकडे निघालेल्या रसाळ सरांच्या ‘नव्या वाटा शोधणारे कवी’ या १६ व्या पुस्तकाचे प्रकाशन आणि सत्कार सोहळा शुक्रवारी झाला.   

सरांना नेमकी खंत काय असेल? असे विचारले असता ते सांगतात, मला  संस्कृत शिकता आले नाही, ही आयुष्यात राहून गेलेली गोष्ट व त्याची आजही खंत वाटते. संस्कृत भाषेत भरत मुनी, आनंद वर्धन, अभिनव गुप्त व मंमट यांनी ज्या प्रकारे समीक्षेची भर घातली ती मला मुळापासून समजून घेता आली नाही. मूलभूत विचार समजून घेणे व भाषांतर वाचून समजून घेणे यात फरक असतो व तो कायम राहिला आहे. भाषांतरित वाचल्यामुळे वरील विभूतींच्या कलाकृतीची सत्यता तपासता आली नाही. 

समीक्षेवर कुणाचा प्रभाव?  रसाळ सर म्हणाले, गंगाधर गाडगीळ, बा. सी. मर्ढेकर व वा. ल. कुलकर्णी यांच्या समीक्षेने मला भुरळ पाडली. तार्किकदृष्ट्या त्यांच्या व माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत मला साम्य आढळले. त्यांच्या समीक्षेचा माझ्यावर निश्चितच प्रभाव आहे. 

पाश्चात्त्य समीक्षेच्या कुबड्या नको  लेखकाचे पुस्तक वाचल्यावर त्यातील गुण-दोष जेव्हा मी दाखवितो, त्या वेळेस मी कटाक्षाने त्यांच्या भूमिकेबद्दल, दोषाबद्दल लिहितो. व्यक्तिगत टीका केली नाही व करत नाही. माझ्या लेखनामुळे काही लेखक दुखावले; पण मी कधी आकस धरला नाही.

पाश्चात्त्य समीक्षेच्या कुबड्या टाकून स्वतंत्रपणे विचार करायला हवा. जोपर्यंत स्वतंत्र विचाराने एखाद्या कलाकृतीकडे पाहणार नाही, तोपर्यंत त्याची गुणग्राहकता दाखविता येणार नाही, असा सल्लाही ते उदयोन्मुख समीक्षकांना देतात. 

गांधेलीच्या सुपुत्राची गरुडझेपरसाळ कुटुंब मूळचे गांधेलीचे. (ता. जि. छत्रपती संभाजीनगर). त्यांच्या वडिलांकडे या गावची पाटीलकी व कुळकर्णीकी होती. सुधीर रसाळ यांचा जन्म १० ऑगस्ट १९३४ रोजी वैजापुरात झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पाहण्याचा योगही त्यांना आला. शासकीय कला महाविद्यालय व त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी भाषेचे अध्यापन त्यांनी केले.