शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी

By admin | Published: February 21, 2017 10:31 PM

लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी १० वाजता दहाही तालुक्यांच्या ठिकाणी होणार आहे.

लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी १० वाजता दहाही तालुक्यांच्या ठिकाणी होणार आहे. गट व गणांसाठी मतमोजणीचे स्वतंत्र टेबल असून, प्रत्येक टेबलांवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक सहाय्यक, एक मास्टर ट्रेनर व एक चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. दरम्यान, मतमोजणीचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, बुधवारी दहाही तहसील कार्यालयांत दुपारी ३.३० वाजता मतमोजणीची रंगीत तालीमही होणार आहे. टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, लेखापालांचे पथक मतदान निश्चितीसाठी नियुक्त करण्यात आले आहे. प्रशासनाने निवडणूक झाल्यापासून मतमोजणीसाठी दोनवेळा संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. याव्यतिरिक्त बुधवारी मतमोजणीची रंगीत तालीम होणार आहे. ही तालीम प्रत्यक्ष मतमोजणीसारखीच असणार आहे. डमी इलेक्ट्रॉनिक मशीनचे सील उमेदवारासमोर उघडणे व सह्या घेणे आणि त्यानंतर मतमोजणी. जेवढे कर्मचारी प्रत्यक्ष मतमोजणीला नेमण्यात आले आहेत, तेवढेच या रंगीत तालमीतही असणार आहेत. त्यानुसार बुधवारी सर्व तहसील कार्यालयांत दुपारी ३.३० वाजता मतमोजणीची रंगीत तालीम होणार असल्याचे सामान्य प्रशासनाचे जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सांगितले. गुरुवारी होणाऱ्या प्रत्यक्ष मतमोजणीला जिल्ह्यातील ५८ गटांसाठी ५८ टेबल आणि ११६ गणांसाठी ११६ टेबल. प्रत्येक टेबलांवर चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. गट व गणांची स्वतंत्र टेबले असल्याने काहींचे निकाल लवकर लागण्याची शक्यता आहे. मतमोजणी कक्षाबाहेरील लोकांना फेरीनिहाय निकाल सांगण्याची सोय करण्यात आली असून, मतमोजणी कक्षातील कामकाजाचे व्हिडिओ चित्रिकरण होणार आहे. शिवाय, तेथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, ओळखपत्राशिवाय मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून उमेदवार, प्रतिनिधींना ओळखपत्र दिले जाणार आहे. दरम्यान, औसा तालुक्यातील नऊ गट आणि अठरा गणांसाठी प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात गुरुवारी मतमोजणी होणार आहे. गट व गणांसाठी स्वतंत्र टेबलांची सोय करण्यात आली असून, एका टेबलवर एकूण ४ कर्मचारी मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.