औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावेळी व्हीव्हीपॅटचा निवडणुकीत वापर केल्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या (मतपत्रिकांची) मोजण्यात येणार आहेत. त्यामुळे अंतिम निकाल लागण्यास काही तासांचा विलंब होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन निवडणूक निरीक्षकांची नेमणूक आयोगाने औरंगाबादेत केली असून, प्रत्येकी तीन-तीन विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी त्यांच्या देखरेखीखाली होणार आहे. जिल्हा प्रशासनाने सोमवारी चिकलठाण्यातील मेल्ट्रॉन कंपनीच्या आवारात असलेल्या मतमोजणी केंद्राला भेट देऊन आढावा घेतला.२०२१ ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी किमान आठ ते दहा तास व त्यानंतर व्हीव्हीपॅअसाठी चार ते पाच तास लागतील, असा अंदाज गृहीत धरून मतमोजणीचा निकाल अंतिम देण्यास रात्री ९ वाजण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.यावेळी सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची मतमोजणी होणार आहे, त्या चिठ्ठ्यांची मोजणी ईव्हीएमसोबत करायची की, संपूर्ण ईव्हीएमची मतमोजणी झाल्यावर यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविले. मात्र, यासंदर्भात अजून आयोगाने स्पष्ट अभिप्राय दिलेला नाही. त्यामुळे संपूर्ण ईव्हीएमची मतमोजणी झाल्यानंतरच व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची मोजणी करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. आयोगाकडून काही सूचना आल्या, तर याबाबत निर्णय बदलणे शक्य आहे.दोन निवडणूक निरीक्षकांची नेमणूकनिवडणूक आयोगाने यावेळी दोन निवडणूक निरीक्षक (आॅब्झर्व्हर) नेमले आहेत. झारखंड येथील ब्रजमोहन आणि दीव दमण येथील सचिव देवेंद्रसिंह, असे निरीक्षक आहेत. ज्या लोकसभा मतदारसंघ आहेत, त्याठिकाणी ३ विधानसभा मतदारसंघांमागे एक निरीक्षक आयोगाने नेमला आहे. दोन्ही निरीक्षक सोमवारी सायंकाळी शहरात आले असून, त्यांनी स्ट्राँग रूमसह मतदान मोजणी केंद्राचा आढावा घेतला. २१ रोजी सकाळी ७ वा. सुविधांची रंगीत तालीम होणार आहे.२२ मे रोजी रंगीत तालीममतदारसंघाची टेबल व फेरीनिहाय मतमोजणी, पोस्टल बॅलेट व ईटीपीबीएस यांची मतमोजणी झाल्यानंतर निकाल घोषित केला जाणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. सदर मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांना १४ मे रोजी प्रथम प्रशिक्षण देण्यात आले. आता मतामोजणीची रंगीत तालीम ही २२ मे रोजी मेल्ट्रॉन येथे घेण्यात येणार आहे.प्रत्येकी १४ टेबल६ विधानसभा मतदारसंघनिहाय होणाºया मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल असणार आहेत. त्यानुसार मतमोजणीच्या फेºया होणार आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद मध्य, गंगापूर- खुलताबाद, वैजापूर- गंगापूर, कन्नड- सोयगाव, असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.
दोन निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत होणार मतमोजणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:02 PM
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावेळी व्हीव्हीपॅटचा निवडणुकीत वापर केल्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या (मतपत्रिकांची) मोजण्यात येणार आहेत. त्यामुळे अंतिम निकाल लागण्यास काही तासांचा विलंब होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देअंतिम निकाल हाती येण्यास होणार उशीर : ईव्हीएमनंतर व्हीव्हीपॅटच्या मतपत्रिकांची मोजणी