शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

गुन्हेगारांचे धाडस वाढले; थर्टी फर्स्टच्या बंदोबस्तावरून घरी जाणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 17:20 IST

A police constable was beaten and robbed in Aurangabad : थर्टी फर्स्टचा बंदोबस्त ते सूतगिरणी चौकात राखीव अंमलदार म्हणून करीत होते.

ठळक मुद्देदुचाकीवरून उतरलेल्या आरोपींनी अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली.तातडीने आरोपींचा शोध घेऊन संसारनगरात एका आरोपीला पोलिसांनी पकडले.

औरंगाबाद: कामावरून घरी जाणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला तीन जणांनी रस्त्यात अडवून बेदम मारहाण करून त्यांच्या खिशातील १ हजार ४६० रुपये हिसकावून घेतले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी कॉन्स्टेबलच्या मोटारसायकलवर दगड घालून नुकसान केले. आरोपी त्यानंतर दुचाकीवर बसून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या काही तासात एका आरोपीला अटक केली.

नितीन भास्कर वक्ते (वय ३०), गौतम राम कदम (४०) आणि दीपक रमेश वक्ते (तिघे रा. संसार नगर ) अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मुळे पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. थर्टी फर्स्टचा बंदोबस्त ते सूतगिरणी चौकात राखीव अंमलदार म्हणून करीत होते. रात्री दीड वाजेच्या सुमारास मुळे हे त्यांची मोटरसायकल घेऊन नंदनवन कॉलनीतील घराकडे अदालत रोड मार्गे जात होते. दोन वाजेच्या सुमारास जीवन विमा कार्यालयाजवळ त्यांच्यामागून आलेल्या ट्रिपल सीट दुचाकीस्वारांनी त्यांना थांबविले.

दुचाकीवरून उतरलेल्या आरोपींनी अचानक त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तर दुसऱ्याने त्यांचे दोन्ही हात मागून पकडले. तिसऱ्याने मुळे यांच्या खिशातील रोख १ हजार ४६० रुपये बळजबरीने काढण्याचा प्रयत्न केला. मुळे यांनी प्रतिकार करताच दुसऱ्या आरोपीने दगड उचलून त्यांच्या कानाजवळ मारला आणि खाली पाडले. यात मुळे जखमी झाले. यावेळी त्यांचे पैसे लुटारुंनी हिसकावून घेतले. अन्य एकाने त्यांच्या दुचाकीवर दगड घालून दुचाकीच्या मडगार्डचे नुकसान केले. यानंतर आरोपी दुचाकीवर बसून पसार झाले. खाली पडल्यामुळे यांनी लगेच पोलीस नियंत्रण कक्ष आणि सपोनि घनशाम सोनवणे यांना फोन करून घटनेची माहिती कळविली. दुचाकीचा क्रमांक त्यांनी पाहिला होता.

एका आरोपीला लागलीच घेतले ताब्यातगस्तीवरील पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने आरोपींचा शोध सुरू केला असता संसारनगरात आरोपी नितीनला पोलिसांनी पकडले. त्याने उर्वरित आरोपींची नावे सांगितली. त्यापैकी एकजण जालना येथे पळून गेला. तर दुसरा घरात लपून बसला आणि स्वतः एसपीओ असल्याचे पोलिसांना आतून सांगायचा. मात्र, तो दार उघडत नव्हता. त्यावेळी गल्लीत लोकांची गर्दी झाल्यानंतर पोलीस तेथून निघून गेले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस