जालना : जिल्ह्यातील दोन पाझर तलावांतील लाखो रुपयांच्या गेरव्यवहार प्रकरणात सातही आरोपींचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. या सर्व आरोपींची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी २७ मे रोजी विशेष न्यायाधीश के.के. गायकवाड यांच्यासमोर झाली. त्यानंतर ३१ मे रोजी या आरोपींचा जामीन फेटाळण्यात आल्याचा निर्णय न्या. गायकवाड यांनी दिला. अटक केलेल्या सातही आरोपींची लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी कसून चौकशी सुरू केली. मात्र तपास अद्यापही अपूर्ण असल्याने आरोपींना जामीन देण्यात येऊ नये, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी अभियोक्ता मुकुंद कोल्हे यांनी केला. आरोपींमध्ये तत्कालीन कार्यकारी अभियंता भास्कर जाधव, र.गा. यादव, तत्कालीन शाखा अभियंता श्रीनिवास बाबाजी काळे, , रामेश्वर अंबादास कोरडे गणेश मजूर सुभाष देशपांडे, वडीगोद्रीच्या गुरूदेव मजूर सहकारी संस्थेचे तत्कालीन चेअरमन राजेंद्र एकनाथ खोमणे व गणेश मजूर सहकारी संस्था तोंडोळीचे ढवळे यांचा समावेश आहे. ७ जणांचे ९ अर्ज आरोपींपैकी रघुवीर यादव व भास्कर जाधव या दोघांविरुद्ध टेंभूर्णी पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याने त्यांनी प्रत्येकी दोन जामीन अर्ज तर उर्वरीत पाच जणांनी प्रत्येकी एक जामीन अर्ज केला होता. सातही आरोपींची ७ मे पासून हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे.
सातही आरोपींचा जामीन न्यायालयाने फेटाळला
By admin | Published: June 02, 2014 12:28 AM