सोयगाव : सकाळी देवदर्शन घेऊनच कामाला सुरूवात करणारे अनेक जण असतात. परंतु हीच कृती सोयगाव तालूक्यातील जरंडी गावातील एक गाय मागील काही वर्षांपासून नियमितपणे करत आहे. चरायला जाण्यापुर्वी ही गाय नियमितपणे मंदिरात येते आणि देवदर्शन घेते, असे काही गावकऱ्यांनी सांगितले.
मागील काही दिवसांपासून सातत्याने गायीचे निरिक्षक करणाऱ्या विष्णू वाघ आणि दिलीप गाडेकर या तरूणांनी सांगितले की, जंगलात जाण्यापूर्वी ती गाय कळपातून आधी हनुमानाच्या मंदिरात जाते आणि त्यानंतर पुन्हा कळपात शिरते. ही गाय गावातच मोकाट म्हणून सोडण्यात आली आहे. गावातील गुराखी या गायीला अनेक वर्षांपासून चरायला जंगलात घेवून जात असतो.
मंदिरात माणसे असतानाही ही गाय मंदिरात शिरते. कुणाला काहीही इजा न करता थेट मुर्तीपाशी जाते. काही सेकंदासाठी मुर्तीजवळ उभी राहते आणि पुन्हा आपल्या मार्गाला निघून जाते, असे ग्रामस्थ म्हणाले.