पेट्रोल-डिझेलच्या किमती तत्काळ कमी करा, खते बी-बियाणे अवजारे आणि शेतीविषयक औषधे यांच्या किमतीमध्ये झालेली वाढ रद्द करा,जीवनावश्यक वस्तू, खाद्यतेले आणि धान्याच्या वाढलेल्या किमती रद्द करा, कराचा भरणा करीत नसलेल्या कष्टकरी कुटुंबांना दरमहा ७५०० रुपये आर्थिक मदत द्या, प्रधानमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे ग्रामकल्याण व अन्य योजना तोकडी असल्यामुळे प्रत्येक कुटुंबास दहा किलो धान्य, डाळी, खाद्यतेले, मसाले चहा इत्यादींचा पुरवठा करा, शेतकऱ्यांना पीक विम्याच्या संदर्भातील नुकसानभरपाई त्वरित अदा करा, असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता द्या आदी मागण्यांचे निवेदन नंतर जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. त्यावर प्रा. राम बाहेती, अशफाक सलामी, अभय टाकसाळ, भास्कर लहाने, मधुकर खिल्लारे आदींच्या सह्या आहेत.
वाढत्या महागाईच्या विरोधात भाकपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:05 AM