जालना : संकरीत बियाणांची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या जालन्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. जालना येथे केंद्र सरकार, राज्य सरकार, बियाणे उत्पादक कंपन्या व बियाणे उत्पादक शेतकरी यांच्या समन्वयातून जालना येथे अंदाजे १०० एकर परिसरात सुमारे १०० कोटीचे सीड हबची स्थापना करण्यात येणार आहे. जालना येथे ‘‘सीड हब’’स्थापन करण्याबाबत नुकतीच कृषी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली व पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक झाली.यामध्ये जालना येथे सीड हब सोबतच मोसंबी उद्योगांची स्थापना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. जालना येथे अंदाजे १०० एकर परिसरात सुमारे रुपये १०० कोटींचे सीड हब निर्माण करण्यात येणार आहे. या मध्ये बियाणे उत्पादकांसाठी कोल्ड स्टोरेज प्रक्र ीया केंद्र, बियाणे तपासणी प्रयोग शाळा, प्रशिक्षण केंद्र इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना शेड नेट, ठिबक सिंचन, शेततळे, तांत्रिक प्रशिक्षण इत्यादी सुविधा पुरविण्यात येणार आहे. या सीड हबमुळे फक्त जालनाच नाहीतर मराठवाड्याचे भविष्य बदलू शकते असे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.याच बैठकीत जालना येथे सोयाबीन प्रक्र ीया उद्योग व मोसंबी प्रक्रिया उद्योग निर्माण करण्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
१०० एकर परिसरात सीड हब निर्माण करणार
By admin | Published: April 01, 2016 12:39 AM