शहरं
Join us  
Trending Stories
1
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
2
Brahmos Deal with Vietnam : 'ब्रह्मोस' भारताला आणखी मालामाल करणार, हा छोटासा देश चीनशी टक्कर घेणार; होणार 700 मिलियन डॉलरची डील!
3
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
4
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले दीड कोटी! आता बोनस शेअर्स आणि लाभांशाची लागणार लॉटरी
5
भारतासमोर चीन गुडघ्यांवर, ड्रॅगन सर्व अटी मानण्यास तयार; नक्की काय आहे प्रकरण?
6
Swami Samartha: आपल्यावर स्वामी कृपा होणार असल्याचे संकेत कसे ओळखावेत? जाणून घ्या!
7
जून आणि ऑगस्टमध्ये रेपो दरात पुन्हा RBI कपात करणार का? लोन होऊ शकतात आणखी स्वस्त
8
लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका अन् सीडीएससीओने ‘त्या’ ३५ औषधांवर घातली बंदी
9
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शनी देणार 'या' पाच राशींना अक्षय्य धनलाभ आणि कीर्ती!
10
"...म्हणून जाती धर्माचे मुद्दे पुढे केले जात आहेत का?", जयंत पाटलांचा महायुती सरकारला सवाल
11
ट्रम्प टॅरिफ धोरणामुळे अमेरिकेची रिझर्व्ह बँकही चिंतेत; अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी व्यक्त केली मोठी भीती
12
कामाच्या वेळी पायावर पाय ठेवला तरी शिक्षा, मुंबईच्या तरुणाचा भयंकर अनुभव, 60 जणांची सुटका
13
लग्न झालेल्या लोकांना विसरण्याचा आजाराचा जास्त धोका? 'ही' आहेत डिमेंशियाची लक्षणं अन् कारणं
14
"मला मुलगी झाल्याने काही लोक निराश झाले", सोहा अली खानचा खुलासा; म्हणाली, "मी तर..."
15
यूट्युबवर व्हिडीओ पाहून रिक्षाचोरीची 'मास्टरी'! एमकॉम, बी टेक सुशिक्षित चोरट्यांचेही आव्हान
16
भयंकर! ४०० प्रवाशांसह बोट नदीत उलटली, ५० जणांचा मृत्यू, १०० जण बेपत्ता
17
दिनेश माहेश्वरी २३ व्या विधि आयोगाचे अध्यक्ष, पुण्याचे ॲड. हितेश जैन यांची सदस्यपदी निवड
18
VIDEO: 'सुपर ओव्हर'मध्ये राजस्थानला होती जिंकायची संधी, पण 'फ्री हिट' मिस झाली अन् मॅच गमावली
19
"तुमचे १०० बाप आले तरी..."; गरजला बाळासाहेबांचा 'एआय' आवाज; भारावले शिवसैनिक!

क्रिकेटपटू इम्रान पटेल मैदानातच कोसळला; निधनाने क्रिकेट जगतात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 21:25 IST

इम्रान पटेल याच्या पश्चात आई, पत्नी, ३ मुली आणि भावंडे असा परिवार आहे.

छत्रपती संभाजीनगर : गरवारे क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी सायंकाळी सामन्यादरम्यान प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू इम्रान पटेल (वय ४०) मैदानातच कोसळला. त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याची प्राणज्योत मालव्याने छत्रपती संभाजीनगर क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली.

गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळच्या सत्रात लकी बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स आणि यंग इलेव्हन यांच्यात सामना सुरु होता. याच सामन्यात यंग इलेव्हन संघाकडून प्रशासक जी. श्रीकांतही खेळत होते. लकी संघाचा कर्णधार इम्रान पटेल याने सामन्याच्या सहाव्या षटकांत दोन चौकारही मारले. मात्र षटक संपल्यानंतर इम्रान पटेल याने गळा आणि हात दुखतोय, मी बाहेर जाऊन औषधाची गोळी घेऊन येतो, असे पंचांना व खेळाडूंना सांगितले.

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनीही इम्रान पटेलला आरोग्य महत्त्वाचे आहे, तू आरोग्याची काळजी घे व रुग्णालयात तत्काळ जा, असा सल्ला दिला. असाच सल्ला यंग इलेव्हनचा कर्णधार संदीप नागरे यानेही इम्रान पटेलला दिला. मैदान सोडतानाच इम्रान पटेल सीमारेषेजवळ अचानक कोसळला. त्यानंतर सर्वच खेळाडूंनी त्याच्याकडे धाव घेतली. सायंकाळी वाहनांची गर्दी असते. त्यामुळे प्रशासक जी. श्रीकांत यांनी त्यांची गाडी व सोबत पायलट घेऊन इम्रान पटेल याला तात्काळ खासगी रुग्णालयात पाठवले. मात्र, डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केल्यानंतरही त्याचे प्राण वाचू शकले नाहीत.

उल्लेखनीय बाब म्हणजे इम्रान पटेल याने गतवर्षी एपीएल स्पर्धेतही आपला विशेष ठसा उमटवला होता. त्याची ग्रीन गोल्ड सान्या युनायटेडविरुद्धची नाबाद ५२ धावांची खेळी क्रिकेट रसिकांच्या आजही स्मरणात आहे. या खेळीमुळे शक्ती स्ट्रायकर्स संघाने उपांत्य फेरी गाठली होती. शेख हबीबनंतर मैदानातच इम्रान पटेल जाणे ही मनाला चटका लावणारी घटना असल्याचे मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

इम्रान पटेल याचा आझाद कॉलेज पॅसिफिक हॉस्पिटलजवळ कब्रस्थानमध्ये दफनविधी झाला. इम्रान पटेल याच्या पश्चात आई, पत्नी, ३ मुली आणि भावंडे असा परिवार आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर