अर्जुन राजेंद्र शेरकर (१८, रा. रांजणगाव) हा त्याचा मावस भाऊ लखन गजानन डोके सोबत रविवारी सकाळी वाळूज एमआयडीसीतून रांजणगावकडे चालले होते. रस्त्यावरून घराकडे जाताना कार्तिकी हॉटेलजवळ अर्जुनला त्याच्या ओळखीचा सोनू भालेराव (रा. रांजणगाव) भेटला. सोनूने अर्जुनला दारूसाठी पैसे मागितले. अर्जुनने माझ्याकडे पैसे नाही, मी तुला पैसे कोठून देऊ, असे सांगताच सोनूने शिवीगाळ करून ब्लेडने अर्जुनच्या तळहातावर वार केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. अर्जुन शेरकरच्या फिर्यादीवरून आरोपी सोनू भालेराव याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
---------------------------------
पंढरपुरात वृद्ध दाम्पत्यास मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा
वाळूज महानगर : पंढरपुरात वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून जखमी करणाऱ्या आरोपीविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरेश अंभू कांबळे (६५ रा. फुलेनगर, पंढरपूर) हे प्रकृती बरी नसल्याने रविवारी (दि.१९) घरी आराम करीत होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शेजारी बाळू शेजवळने कांबळे यांच्या घरी जाऊन दारू पिण्यासाठी पैसे दे किंवा तू दारू पी असे म्हणून वादावादी सुरू केली. कांबळे यांनी तब्येत बरी नसल्याचे सांगत बाळूसोबत बाहेर जाण्यास नकार दिला. त्यामुळे बाळूने कांबळे व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करून हाता-चापटाने मारहाण केली. बाळूने हत्याराने कांबळे यांचा उजवा डोळा व डोक्यावर वार करून जीवे मारण्याची धमकी देऊन पसार झाला. कांबळे यांच्या तक्रारीवरून आरोपी बाळू शेजवळ (रा. पंढरपूर) याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
-------------------------
कमळापुरातून अल्पवयीन मुलगा बेपत्ता
वाळूज महानगर : मित्राला भेटण्यासाठी चाललो, असे सांगून घराबाहेर पडलेला १७ वर्षीय मुलगा बेपत्ता झाला. श्रीकांत दिगंबर गाडेकर (१७, रा. कमळापूर) हा ९ सप्टेंबरला दुपारी मित्राला भेटण्यासाठी जात आहे, असे म्हणून घराबाहेर पडला होता. मात्र, अद्यापपर्यंत श्रीकांत हा घरी न परल्याने त्याचे वडील दिगंबर गाडेकर यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
-------------------------