गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे म्हणाले की, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची १ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार नाना प्रकारचे फंडे वापरत आहेत. खा. सुप्रिया सुळे यांचे नाव दिसणाऱ्या मोबाईलवरून सामान्य नागरिकांना कॉल येत होते. हा फोन उचलताच ऑडिओ क्लिप चालू होते. या क्लीपमध्ये आ. राणा जगजितसिंह हे शिरीष बोराळकर यांना मतदान करण्याचे आवाहन करतात. ही क्लीप आणि कॉलविषयी माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नितीन बागवे यांनी सायबर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक गीता बागवडे या तपास करीत आहेत.
सुप्रिया सुळे यांच्या नावाने ऑडिओ क्लीप व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा
By | Published: December 02, 2020 4:05 AM