लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहानूरवाडी येथील राजनगर सहकारी गृहनिर्माण सोसायटीत छुप्या मार्गाने सुुरू असलेल्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी धाड मारली. या कारवाईत आंटीसह दलालास बेड्या ठोकल्या, तर पश्चिम बंगालमधून आणण्यात आलेल्या तरुणीची मुक्तताकेली.कुमार सुशील देशमुख (२४, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) आणि आंटीचा आरोपीत समावेश आहे. याविषयी अधिक माहिती देताना गुन्हे शाखा पोलिसांनी सांगितले की, पीडिता ही मूळची पश्चिम बंगाल राज्यातील रहिवासी असून, ती पालघर जिल्ह्यातील शिगाव येथे राहते. आरोपी कुमार देशमुख हा दलाल असून, त्याचे विविध ठिकाणच्या कुंटणखानाचालकांशी संबंध आहेत. त्याने पीडितेला शिगाव येथून औरंगाबादेत वेश्या व्यवसायासाठी आणले आणि तो ग्राहकांना बोलावून घेत असे. त्याने आणलेली मुलगी आंटी राहत असलेल्या शहानूरवाडी येथील राजनगर सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील घरात ठेवली होती. आंटी ही तिच्या घरातील एक खोली ग्राहकांना उपलब्ध करून देत असे. ग्राहकांकडून येणारा मोबदला आंटी आणि दलाल वाटून घेत. पीडितेलाही त्यातील काही रक्कम देत. उच्चभू्र सोसायटीत सुरू असलेल्या या गोरखधंद्याची माहिती खब-याकडून गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांना मिळाली. यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त डॉ.दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक कांबळे, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोहेकॉ. संतोष सोनवणे, सुधाकर राठोड, शेख नवाब, विरेश बने, सिद्धार्थ थोरात, लालखा पठाण, योगेश गुप्ता, धर्मराज गायकवाड, नितीन धुळे, हिरासिंग राजपूत, संजीवनी शिंदे, प्राजक्ता वाघमारे यांच्या पथकाने १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी आरोपी आंटीच्या घरी एक बनावट ग्राहक पाठविला. तेव्हा आंटी आणि दलाल यांनी एक तरुणी त्यांच्यासमोर उभी करून दीड हजार रुपये दर सांगितला.पोलिसांच्या बनावट ग्राहकाने दीड हजार रुपये आरोपी कुमार देशमुखकडे दिल्यानंतर आंटीने लगेच घरातील एक खोली उघडून दिली. यानंतर बनावट ग्राहकाने मोबाइलवरून पोलिसांना मेसेज पाठविला. मेसेज मिळताच पोलिसांनी आंटीच्या घरावर धाड मारली. घटनास्थळी रोख ८ हजार ८०० रुपये, तीन मोबाइल हॅण्डसेट आणि इतर वस्तू जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राजनगरातील कुंटणखान्यावर गुन्हे शाखेची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:35 AM